ETV Bharat / entertainment

Gauri khan birthday : शाहरुख खानच्या फॅन क्लब टीमनं गौरी खानचा वाढदिवस केला साजरा; पहा फोटो... - गौरी खानचा वाढदिवस

Gauri khan birthday : शाहरुख खानच्या फॅन क्लब टीमनं गौरी खानचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला आहे. याशिवाय या फॅन क्लबनं किंग खानच्या पत्नीसाठी एक खास केकही बनवला आहे.

Gauri khan birthday
गौरी खानचा वाढदिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 1:59 PM IST

मुंबई - Gauri khan birthday : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची पत्नी गौरी खान आज 8 ऑक्टोबर रोजी तिचा 53वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी किंग खानचे चाहते खूप खुश आहेत. मुंबईत एका खास पद्धतीनं गौरी खानला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. शाहरुखच्या चाहत्यांनी वाढदिवसानिमित्तानं केक कापत गौरीला शुभेच्छा दिल्या आहेत. हा केक खूपच खास आहे. गौरी खानला केकवर राणीसारखी दाखवण्यात आलं आहे. याशिवाय चाहत्यांनी गौरी खानच्या पोस्टरसोबत फोटो काढला, ज्यावर 'टीम शाहरुख खान फॅन क्लब, गौरी खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा'असं लिहिलं आहे. शाहरुख खानच्या फॅन क्लबचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Gauri khan birthday
गौरी खानचा वाढदिवस

गौरी खानला किंग खानच्या चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा : मिळालेल्या माहितीनुसार एका चाहत्यानं यावेळी सांगितलं की, 'राणी असते तर राजाही असतो. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो गौरी मॅडम. तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास छान झाला आहे. तुम्ही सर्वांसाठी प्रेरणास्थान आहात. शाहरुख खान फॅन क्लबकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा'. गौरीनं अलीकडंच आपल्या कुटुंबासह एक फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला होता. या फोटोवर तिनं कॅप्शन दिलं होतं, 'डिझाइन हे एका कोड्यासारखे आहे. संपूर्ण प्रतिमा तयार करण्यासाठी सर्व तुकड्यांना एकत्र याव्या लागतात.' फोटोमध्ये शाहरुख आणि आर्यन खान सूटकेसवर बसले आहेत, तर गौरी आणि सुहाना या किंग खानच्या बाजूला उभ्या आहेत. याशिवाय अबराम त्याच्या वडिलांच्या मागं उभा असलेला दिसत आहे.

गौरी खाननं शेअर केला फोटो : या फोटोमध्ये गौरीनं पांढरा क्रॉप टॉप आणि निळी जीन्स परिधान करुन पोझ दिली, तर शाहरुख खाननं काळा पँट आणि स्नीकर्ससह निळा स्वेटशर्ट घातला आहे. दुसरीकडं, आर्यननं काळ्या जीन्ससह नारंगी रंगाचा स्वेटशर्ट घातला आहे. याशिवाय सुहाना तिच्या वडिलांच्या गालावर किस करताना दिसत आहे. गौरी ही एक फिल्म मेकर आणि इंटिरिअर डिझायनर आहे. तिनं रेड चिलीज एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन कंपनीअंतर्गत 'मैं हूं ना', 'ओम शांती ओम', 'रावण' आणि 'चेन्नई एक्स्प्रेस' या चित्रपटांची निर्मिती केली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'जवान' या चित्रपटाची देखील तिनं सहनिर्माती केली आहे. तसेच 'जवान'नं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे.

हेही वाचा :

  1. Gaza ISrael Conflict : Gaza ISrael Conflict : इस्राईलमधील हमास हल्ल्यामुळे अडकली नुसरत भरूचा; जीवघेणा थरार अन् मग . . .
  2. Box office day 3 : अक्षय कुमार स्टारर 'मिशन रानीगंज' आणि भूमी पेडणेकर स्टारर 'थँक यू फॉर कमिंग' रिलीजच्या तिसऱ्या किती कमाई करेल ?
  3. Suniel Shetty on Bollywood : बॉलिवूड एकसंध राहिलं नाही, सुनील शेट्टीची खंत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.