मुंबई - 'जवान' चित्रपटाचे प्रदर्शन एक महिन्यावर आले असताना शाहरुखच्या चाहत्यांमध्ये असलेला उत्साह कमालीचा वाढीस लागला आहे. चित्रपटाबद्दलची प्रत्येक अपडेट समजून घेण्यासाठी चाहते आतुर आहेत. अशावेळी शाहरुख खानने आज मुख्य कलाकारांसह एक नवीन पोस्टर रिलीज करुन चाहत्यांच्या उत्साहात भर टाकली आहे. शाहरुख खान आणि विजय सेतुपती यांचा फर्स्ट लूक असलेल्या या पोस्टरचे किंग खान फॅन्सनी स्वागत केले आहे.
पोस्टरमध्ये दिसत असलेले विजय सेतुपती आणि नयनतारासह शाहरुख 'जवान'मधील त्यांच्या भूमिकांचे दर्शन घडवत असून यामुळे चित्रपटाची अपेक्षा अनेक पटींनी वाढली आहे. आपल्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्टर शेअर करताना शाहरुखने त्याला कॅप्शन दिले: 'द डेअरिंग. द डेझलिंग. द डेंजरस. 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी जगभरात हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये रिलीज होत आहे.' अशा प्रकारे शाहरुख खानने चित्रपटाच्या रिलीजचे काऊंटडाऊन शाहरुखने या पोस्टपासून सुरू केले आहे.
शाहरुखने ही पोस्ट टाकताच नव्या पोस्टरचे चाहत्यांनी मनापासून स्वागत केले. कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला आहे. हार्ट आणि फायर इमोटिकॉन्स याशिवाय फॅन्सनी ते चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याची किती आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत याबद्दलच्या प्रतिक्रिया लिहिल्या आहेत. 'धाडसी शाहरुख, डॅशिंग नयनतारा आणि धोकादायक विजय,' असे डी त्रिकुट असल्याचे एका युजरने म्हटलंय. 'माफ कर पठाण आम्ही आता 'जवान'सोबत' असल्याचेही एकाने लिहिलंय.
'जवान' चित्रपटाचे दिग्दर्शन साऊथचे दिग्दर्शक अॅटली कुमार करत आहेत. शाहरुख खान शिवाय चित्रपटात नयनतारा आणि विजय सेतुपती देखील दिसणार आहेत. याव्यतिरिक्त, दीपिका पदुकोण या चित्रपटात एक छोटीशी पण महत्त्वाची भूमिका साकारत आहे. जवानामध्ये प्रियमणी, सान्या मल्होत्रा आणि रिद्धी डोगरा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
'पठाण' नंतर 'जवान' हा शाहरुखचा २०२३ मधील दुसरा चित्रपट आहे. 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर असंख्य रेकॉर्ड तोडली होती आणि शाहरुखच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला. 'पठाण' चित्रपटातून चार वर्षांच्या अंतरानंतर शाहरुखचे पुनरागमन झाले होते.
हेही वाचा -
१. Dhanush catches Jailer FDFS : धनुषने पाहिला 'जेलर'चा पहिला शो, फॅन्सचा सोशल मीडियावर जल्लोष सुरू
२. Tiger Shroff : दिशा पटानीनंतर कोण आहे टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड?
३. Gadar 2 vs OMG 2: 'गदर २' आणि 'ओ माय गॉड २'मध्ये होणार बॉक्स ऑफिसवर टक्कर