ETV Bharat / entertainment

Shah Rukh Khan birthday: शाहरुखच्या वाढदिवशी होणार जंगी सेलेब्रिशन; सलमान, दीपिका, आलियासह होणार स्टार स्टडेड पार्टी - सुपरस्टार शाहरुख खान बर्थडे

शाहरुख खान 2 नोव्हेंबर रोजी आपला 58 वा वाढदिवस साजरा करणार आहे. किंग खानचे मुंबईतील चाहते आणि इंडस्ट्रीतील जवळच्या मित्रांसह हा दिवस साजरा करण्यासाठी एका भव्य कार्यक्रमाची तयारी सुरू झालीय.

Shah Rukh Khan birthday
शाहरुखच्या वाढदिवशी होणार जंगी सेलेब्रिशन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2023, 2:55 PM IST

मुंबई - सुपरस्टार शाहरुख खान या वर्षी त्याचा 58 वा वाढदिवस त्याच्या खास स्टाईलमध्ये साजरा करणार आहे. यासाठी एका भव्य सोहळ्याचं आयोजन केलं जाणार आहे. यावर्षी मिळालेल्या 'पठाण' आणि 'जवान' चित्रपटाच्या यशाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या बर्थडे पार्टीचं 2 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजन होणार आहे. त्याच्या चाहत्यांमध्येही यानिमित्तानं मोठा उत्साह आहे. त्याच्या फॅन क्लबच्यावतीनं रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिरे आणि ब्लँकेट दान करण्यापासून अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

शाहरुखसाठी त्याच्या यंदाचा वाढदिवस खास आहे. यावर्षी चार वर्षाच्या ब्रेकनंतर त्याचा 'पठाण' चित्रपट रिलीज झाला. वादाच्या पार्श्वभूमीवर रिलीज झालेल्या या चित्रपटाला अद्भूतपूर्व यश मिळालं आणि शाहरुख पुन्हा एकदा बॉलिवूडचा किंग खान असल्याचं सिद्ध झालं. त्यानंतर आलेल्या त्याच्या 'जवान' चित्रपटानं 'पठाण'चेही विक्रम मोडीत काढले. यामुळे त्याला पुन्हा एका हिंदी चित्रपटसृष्टीचा सर्वाधिक लोकप्रिय कलाकाराचा बहुमान पुन्हा प्राप्त झाला. अशावेळी त्याचा 58 वा वाढदिवस जोरदार साजरा करण्यासाठी त्यानं कोणतीही कसर सोडलेली नाही. भारतीय सिनेजगतातील काही मोठ्या व्यक्तींना या सेलेब्रिशनमध्ये सामील करण्यासाठी आमंत्रित करण्याचा निर्णय त्यानं घेतला आहे.

या पाहुण्यांच्या यादीमध्ये करण जोहर, आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, राजकुमार हिरानी, ऍटली आणि बरेच काही फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गजांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, शाहरुख खानचा जवळचा मित्र सलमान खानही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आमिर खान किंग खानच्या 58 व्या वाढदिवसाच्या पार्टीला हजर राहणार की नाही हे पाहायचंय. कारण तो सध्या चेन्नईमध्ये त्याच्या आजारी आईच्या आजारपणात सेवेसाठी गेला आहे.

राजकुमार हिरानी दिग्दर्शित आगामी 'डंकी' हा शाहरुखचा आगामी चित्रपट रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. या चित्रपटाचा टीझर 2 नोव्हेंबर 2023 रोजी शाहरुखच्या वाढदिवसानिमित्य रिलीज केला जाणार आहे. टीझर रिलीज झाल्यानंतर तो त्याच्या मन्नत या घराबाहेर चाहत्यांना येऊन अभिवादन करणार आहे. संपूर्ण फिल्म इंस्ट्रीसाठी या दिवशी स्टार-स्टडेड पार्टीचं आयोजन केलं जाणार आहे.

हेही वाचा -

  1. Salman And Cristiano Ronaldo : सलमान खान आणि क्रिस्टियानो रोनाल्डोचा फोटो व्हायरल, सौदी अरेबियात झाली भेट

2. Dunki Teaser : शाहरुख खानच्या वाढदिवसाला 'डंकी'चा टीझर होईल प्रदर्शित....

3. Varun Tej Lavanya Tripathi Wedding: वरुण तेज आणि लावण्याच्या कॉकटेल पार्टीत रामचरणसह अल्लु अर्जुनची धमाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.