हैदराबाद - कालिदासाच्या अभिज्ञानशाकुंतलम नाटकावर आधारित समंथा रुथ प्रभू स्टारर चित्रपट शाकुंतलम शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये संमिश्र प्रतिसादासह प्रदर्शित झाला. एका फिल्म इंडस्ट्री ट्रॅकरच्या मते, गुणशेखर दिग्दर्शित पौराणिक चित्रपटाने त्याच्या सुरुवातीच्या दिवशी मोठी गर्दी केली नाही आणि सर्व भाषांमध्ये 5 कोटी रुपये इतकीच कमाई होऊ शकली.
शनिवार, रविवारी वाढू शकते कमाई - तेलुगु भाषिक राज्यांमध्ये, शाकुंतलमचा एकूण 32.60% व्याप होता. चित्रपटात समंथा शकुंतलाची मुख्य भूमिका साकारत आहे आणि देव मोहनने पुरू वंशाचा शासक दुष्यंताची भूमिका साकारली आहे. आगामी आठवड्यासाठी चित्रपटगृहांमध्ये सातत्य राखण्यासाठी शाकुंतलमने आता वीकेंडमध्ये वेग वाढवला पाहिजे. शनिवारी आणि रविवारी सामान्यपणे प्रेक्षक चित्रपट पाहण्यास प्राधान्य दोतात. त्यामुळे या दोन्ही दिवशी प्रेक्षक चित्रपटगृहाकडे वळले तर पहिला वीकेंड चांगला जाऊ शकतो.
तुलनेत बरी सुरुवात - समंथाचा मागील चित्रपट यशोदाने सुमारे 3 कोटी रुपयांपासून सुरुवात केली आणि बॉक्स ऑफिसवर 10 कोटी रुपयांची कमाई करून पहिल्या वीकेंडचा शेवट केला. या चित्रपटाने संपूर्ण भारतात सुमारे 20 कोटींची कमाई केली. त्या तुलनेत शाकुंतलमचे भविष्य अधिक आशादायक वाटते. तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या तेलुगु भाषिक राज्यात या चित्रपटाचे चांगले प्रमोशन झाले आहे. शिवाय हा चित्रपट कन्नड, तामिळ, मल्याळम आणि हिंदी भाषेतही रिलीज झालाय.
बिग बजेट चित्रपट - शाकुंतलम त्याच्या ट्रेलरच्या लूकवर आधारित विचार केल्यास मोठ्या बजेटमध्ये तयार करण्यात आल्याचे दिसते. या चित्रपटात मोहन बाबू, अल्लू अर्हा, अदिती बालन, गौतमी, सचिन खेडेकर आणि अनन्या नागल्ला यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटाच्या व्हिएफएक्सवर मोठा खर्च झालेला असू शकतो. चित्रपटाचे बहुतांश शुटिंग हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीतील स्टुडिओमध्ये पार पडले आहे.
चित्रपट निर्माते राज आणि डीके यांनी केले कौतुक - सध्या समंथा रुथ प्रभू आणि वरुण धवन अभिनीत स्पाय थ्रिलर मालिका सिटाडेलच्या भारतीय आवृत्तीचे दिग्दर्शन करत असेलेल चित्रपट निर्माते राज आणि डीके यांनी शकुंतलमची प्रशंसा करणारी एक चिठ्ठी लिहिली. चित्रपट पाहिलेल्या दिग्दर्शक जोडीने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर समंताचे कौतुक केले आहे.