ETV Bharat / entertainment

Vijay Deverakonda : विजय देवरकोंडाने 1 कोटी देणगी जाहीर केल्यानंतर, 'वर्ल्ड फेमस लव्हर'च्या निर्मात्यांनी पसरला पदर, वाचा किती झालं होतं नुकसान - Vijay Deverakonda

Vijay Deverakonda : विजय देवरकोंडानं अलीकडेच रिलीज झालेल्या 'खुशी'च्या कमाईतून 1 कोटी रुपयांची देणगी जाहीर केली. त्यानंतर 'वर्ल्ड फेमस लव्हर'च्या निर्मात्यांनी 8 कोटी रुपये गमावल्याची आठवण करुन दिली. त्याचाही विचार करावा असं त्यांनी सूचित केलंय. वाचा काय आहे प्रकरण...

Vijay Deverakonda
विजय देवरकोंडा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 3:23 PM IST

मुंबई Vijay Deverakonda : विजय देवरकोंडा सध्या त्याच्या 'खुशी' चित्रपटासाठी चर्चेत आहे. अलीकडेच विजयनं 1 कोटी देणगी देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर विजयचं अनेकजणांनी सोशल मीडियावर कौतुक केलं होतं. विजयचं नाव हे दक्षिणेतील हिट कलाकारांमध्ये गणलं जातं. त्याचा 'लाइगर' हा चित्रपट अतिशय वाईटरित्या फ्लॉप झाला होता. दरम्यान आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'खुशी' चित्रपटाला चांगला प्रतिसाद चाहते देत आहेत. आता विजय आणि सामंथा रुथ प्रभू यांचा 'खुशी' चित्रपट 100 कोटींच्या जवळपास पोहोचणार आहे. 'खुशी'च्या यशामुळे विजय 1 कोटी रुपये गरजू कुटुंबांना देणार आहे. विजयचे हे पाऊल काही लोकांना आता खटकत आहे.

  • Dear @TheDeverakonda ,
    We lost 8 crs in the distribution of #WorldFamousLover, but no one responded over it!!

    Now as you are donating 1CR to the families with your big heart, Kindly requesting & Hoping for you to save us and our Exhibitors & Distributors families also 🤗❤️… pic.twitter.com/dwFHytv1QJ

    — ABHISHEK PICTURES (@AbhishekPicture) September 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अभिषेक पिक्चर्सने केले ट्विट : अभिषेक पिक्चर्सनं विजयच्या 1 कोटी रुपयांच्या देणगीसंदर्भात एक्सवर एक पोस्ट टाकली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'प्रिय विजय देवरकोंडा, 'वर्ल्ड फेमस लव्हर'च्या वितरणात आमचं 8 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. परंतु यावर कोणीही प्रतिक्रिया दिली नाही. आता तुम्ही मोठ्या मनानं 1 कोटी रुपये दान करत आहात. आपणास विनंती आहे की प्रदर्शक आणि वितरकांनी देखील याची काळजी घ्यावी, अशी त्यांनी पोस्ट केली आहे. वर्ल्ड फेमस लव्हरच्या मेकर्सची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'वर्ल्ड फेमस लव्हर' हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2020 रोजी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं एकूण बजेट 35 कोटी रुपये होतं. या चित्रपटानं मात्र रूपेरी पडद्यावर फक्त 16 कोटीचा व्यवसाय केला होता.

खुशी चित्रपटाकडून अपेक्षा : 'वर्ल्ड फेमस लव्हर' या चित्रपटात विजयसोबत राशी खन्ना आणि ऐश्वर्या राजेश या अभिनेत्री झळकल्या होत्या. दरम्यान आता विजयला 'खुशी' चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहे. 'खुशी' हा चित्रपट हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषेत डब करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये जयराम, मुरली शर्मा, सचिन खेडेकर, लक्ष्मी, राहुल रामकृष्ण, अली, रोहिणी, वेनेला किशोर, श्रीकांत अय्यंगार आणि सरन्या हे कलाकर आहेत. 'खुशी' चित्रपटाचं संगीत हेशम अब्दुल वहाबनं दिलं आहे. 'खुशी'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी 16 कोटींचा व्यवसाय केला होता. या चित्रपटामध्ये विजय आणि सामंथा रुथ प्रभू जोडी प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

हेही वाचा :

  1. Jackie Shroff : 'इंडिया' विरुद्ध 'भारत' वादावर अभिनेता जॅकी श्रॉफची सूचक प्रतिक्रिया, म्हणाला...
  2. Amitabh Bachchan Tweets : 'इंडिया' 'भारत' वादात महानायकाची उडी
  3. Vicky Kaushal And Katrina Kaif : कतरिना-विक्कीच्या नात्यात कसा आला लग्नाचा ट्विस्ट, वाचा कसा फुलला नात्याचा गुलाब...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.