मुंबई: कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये रिलीजच्या पाचव्या दिवसापासून सातत्याने घट होत आहे. गुरुवारी (६ जुलै) रोजी चित्रपटाच्या कमाईत पुन्हा घसरण पाहायला मिळाली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर केवळ २.७० कोटींची कमाई करू शकला. दरम्यान, आता 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या ९व्या दिवसाचे अंदाजे कलेक्शनचा रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुसार हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करत नाही आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांना फार जास्त या चित्रपटाकडून अपेक्षा होती. मात्र आता चित्रपटाच्या कमाईवरून त्यांच्या अपेक्षा या मावळताना दिसत आहे.
बॉक्स ऑफिसवरची एकूण कमाई : 'सत्यप्रेम की कथा'ने पहिल्या दिवशी ९.२५ कोटी रुपये, पहिल्या शुक्रवारी ७ कोटी रुपये, शनिवारी १०.१० कोटी रुपये, रविवारी १२.१५ कोटी रुपये, पहिल्या सोमवारी ४.२१ कोटी रुपये, पहिल्या मंगळवारी ४.०५ कोटी रुपये, पहिल्या बुधवारी ३.८५ कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये सातत्याने घट होऊनही, चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर ५० कोटींचा आकडा पार केला. दरम्यान दुसऱ्या वीकेंडच्या पहिल्या दिवशी, 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाची जादू फिकी पडली आणि ९व्या दिवशी हा चित्रपट २.७ कोटींची कमाई करू शकला. ८व्या दिवसात या चित्रपटाची एकूण कमाई ५२.९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
चित्रपटाच्या कमाईत वेग मंदावला : दरम्यान, रिलीजच्या ९व्या दिवशी एकदा पुन्हा चित्रपटाचा वेग मंदावला आहे. दुसऱ्या शुक्रवारी, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे २.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे, त्यानंतर देशांर्गत बॉक्स ऑफिसवर कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर 'सत्यप्रेम की कथा'चे एकूण कलेक्शन ५५ कोटी रुपयांवर गेले आहे. 'सत्यप्रेम की कथा'च्या ट्रेलर आणि गाण्यांना रिलीजपूर्वी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाच्या कमाईत घट होत असल्यामुळे हा चित्रपट १०० कोटीच्या कल्बमध्ये जाणार की नाही यावर एक शंका निर्माण झाली आहे. मात्र आता देखील या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटापासून अपेक्षा सोडली नाही आहे. या वीकेंडच्या शनिवार, रविवारी हा चित्रपट किती कमाई करेल हे काही काळानंतर समजेल.
हेही वाचा :