ETV Bharat / entertainment

Satish Kaushiks daughter Vanshika : डोईवरील बापाचे छत्र हपरलेल्या वंशिकाने पोस्ट केला वडिलांसोबतचा फोटो

author img

By

Published : Mar 10, 2023, 2:27 PM IST

डोईवरील बापाचे छत्र हपरलेल्या ११ वर्षाची चिमुरडी वंशिकाने वडिल सतिश कौशिक यांच्यासोबतचा एक थ्रोबॅक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यावर अनेकजण प्रतिक्रिया देत असून तिचे सांत्वन करत आहेत.

वंशिकाने पोस्ट केला वडिलांसोबतचा फोटो
वंशिकाने पोस्ट केला वडिलांसोबतचा फोटो

मुंबई - अभिनेता सतिश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांची अकरा वर्षांच्या चिमुरडी मुलगी वंशिका हिच्या डोईवरचे मायेचे छत हरवले आहे. वंशिका हिने गुरुवारी रात्री वडिलांसोबतचा एक थ्रोबॅक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. फोटोत वंशिकाने वडिलांच्या गळ्यात मायेची मिठी मारलेली दिसत आहे. वंशिकाने हा फोटो पोस्ट केल्यानंतर लगेचच चाहत्यांनी या फोटोवर मनापासून प्रतिक्रिया दिल्या. दिग्दर्शक शेखर कपूर यांनी फोटोवर हृदयाचे इमोजी पोस्ट केले. एकाने लिहिलं, 'स्टे स्ट्राँग गर्ल...', दुसर्‍याने लिहिले, 'तू फक्त आनंदाला पात्र आहेस बाळा, तुझ्या वडिलांना नेहमी अभिमान वाटू दे.'

सतीश कौशिक यांचे 8 मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते एका मित्राच्या होळीच्या पार्टीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला गेले होते. त्यांच्या निधनाच्या एक दिवस आधी मुंबईत जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या होळीच्या सोहळ्याला अभिनेता सतिश कौशिक उपस्थित होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांचे चाहते आणि अनुयायांसह संपूर्ण चित्रपटसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. सतिश यांनी 1985 मध्ये शशी कौशिक यांच्याशी लग्न केले. त्यांचा मुलगा शानू कौशिक 1996 मध्ये तो फक्त दोन वर्षांचा असताना मरण पावला. पुत्र शोकाने व्यथित झालेल्या कौशिक दांपत्याला 2012 मध्ये त्यांची मुलगी वंशिकाचा जन्म सरोगसीद्वारे झाला.

वंशिका तिच्या वडिलांसोबत रील व्हिडिओ शेअर करत असे. वडील-मुलगी दोघे एकत्र मस्ती करत असत. सतिशयांना 'मिस्टर' सारख्या चित्रपटांने देशाच्या घराघरात अभिनेता म्हणून पोहोचवले. 'भारत', 'जाने भी दो यारो', 'साजन चले ससुराल', 'दीवाना मस्ताना' हे त्यांचे गाजलेले आणखी काही चित्रपट होते. अत्यंत मनमिळावू, मित्रांच्यात सहज मिसळणारा, सहकलाकार आणि क्रूला नेहमी हसत खेळत ठेवत सृजनाचे काम करुन घेणारा, एक लेखक, अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अशा सर्व आघाड्यांवर सतिश कौशिक यांनी काम केले. चतुरस्त्र, अष्टपैलू, प्रतिभावान हे सर्व शब्द जणू सतिश कौशिक यांच्यासाठीच बनले होते. कौशिक यांच्या कुटुंबाला जेवढे दुःख झाले आहे तितकेच दुःख त्यांच्या फिल्मी परिवाराला आणि चाहत्या प्रेक्षकांनाही झाले आहे. एक मनमुराद जीवन जगणारा कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे.

हेही वाचा - Bheed Trailer Released : भिड ट्रेलर रिलीज, कोविड लॉकडाऊनची खरी आणि भयावह कथा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.