ETV Bharat / entertainment

Sanya Malhotra Terrible Experience : दंगल गर्ल सान्या मल्होत्राने शेअर केला चाहत्यासोबतचा विचित्र अनुभव... - वाईट स्पर्श

अभिनेत्री सान्या मल्होत्राने आपला वाईट अनुभव शेअर केला आहे. तिने सांगितले की, एकदा एक चाहता तिच्याकडे फोटो काढण्यासाठी आला आणि तिला त्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला.

Sanya Malhotra
सान्या मल्होत्रा
author img

By

Published : May 24, 2023, 11:45 AM IST

मुंबई : कलाकारांचे त्यांच्या चाहत्यांशी खास नाते असते. अनेकवेळा चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात, तर दुसरीकडे अनेक वेळा याच्या उलटही पाहायला मिळाले आहे. चाहते त्यांच्या कॅमेरात त्याच्या आवडत्या स्टारचे फोटो येण्यासाठी विचित्र गोष्टी करतात. अलीकडेच आहाना कुमराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता अभिनेत्री सान्या मल्होत्रानेही तिचा वाईट अनुभव शेअर केला आहे. एका मुलाखतीदरम्यान दंगल गर्लने सांगितले की, एकदा फोटो क्लिक करताना तिला एका चाहत्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता.

वाईट अनुभव : सान्याने सांगितले की, काही वर्षांपूर्वी एक व्यक्ती तिच्या जवळ फोटो काढण्यासाठी आला होता. त्यावेळी तिला त्या व्यक्तीने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. दरम्यान, ती अस्वस्थ झाली, मात्र तिच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. सान्याने सांगितले की, काही वर्षांपूर्वी मुंबईत तिच्यासोबत ही घटना घडली होती. तिने सांगितले की, एक माणूस तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी आला आणि तिच्या नितंबावर हात ठेवला. यावर अभिनेत्री संतापली आणि म्हणाली 'काय रे?' मला अस्वस्थ पाहूनही मला फोटोग्राफर्सनी मला मदत केली नाही. त्यानंतर तिने सांगितले की, मेट्रोमध्ये प्रवास करताना काही मुलांनी तिची छेड काढली. तिने पुढे सांगितले की, एकदा संध्याकाळी ती कॉलेजमधून घरी परतत होती, तेव्हा मुलांचा एक ग्रुप हा मेट्रोमध्ये चढला आणि तिला त्रास देऊ लागला.

भीतीदायक परिस्थिती : सान्याने सांगितले की, मी त्यावेळी एकटी होते म्हणून मी गप्प राहिले. मी काहीच करू शकत नव्हते अशी परिस्थिती होती. खरं तर मला त्यावेळी असहाय्य वाटत होते पण मला माहीत होतं की मी काही बोललो तर काहीही होऊ शकते. साधारणपणे लोक म्हणतात, 'तुम्ही काही का केले नाही?' पण अशा परिस्थितीत हात-पाय फुगतात आणि अशावेळी तुम्हाला त्या परिस्थितीला टाळायचे असते. सान्या पुढे म्हणाली की, मेट्रोमध्ये मला कोणीही मदत करायला आले नाही हे भीतीदायक आणि आश्चर्याची गोष्ट होती. गर्दीसाठी देवाचे आभार, त्यामुळे मी स्टेशनच्या बाहेर पडू शकले. दरम्यान, सान्या मल्होत्राच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, ती नुकत्याच रिलीज झालेल्या 'कटल'मध्ये शेवटची दिसली होती, या चित्रपटात तिच्यासोबत विजय राज आणि राजपाल यादव देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट १९ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा : Zee5 announces 111 new projects : झी५ ने १११ नव्या रंजक प्रोजेक्ट्सची केली घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.