ETV Bharat / entertainment

Samantha Ruth Prabhu : सामंथा रुथ प्रभूच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन... - समंथा घेतला ब्रेक

सामंथा रुथ प्रभूच्या घरी एका नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. या पाहुण्याला तिने आपल्या मीठीत घेतले आहे. आता हा नवीन पाहुणा कोण आहे. जाणून घ्या...

Samantha Ruth Prabhu
सामंथा रुथ प्रभू
author img

By

Published : Jul 20, 2023, 4:56 PM IST

मुंबई : साऊथ अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू ही नेहमीच तिच्या चित्रपटामुळे नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा सामंथा ही चर्चेत आली आहे. अभिनयातून एक वर्षाचा ब्रेक घेऊन तिने आपल्या तब्येतीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, समांथाने चाहत्यांना तिच्या घरी आलेल्या छोट्या सदस्याची ओळख करून दिली आहे.

सामंथाच्या घरी आला नवीन पाहुणा : सामंथाने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती नवीन सदस्याला मिठी मारताना दिसत आहे. सामंथाच्या घरी आलेला नवीन सदस्य दुसरा तिसरा कोणी नसून तिची नवीन पाळीव किटी आहे. जीचे नाव तिने गिलोट्टो असे ठेवले आहे. सामंथाकडे दोन पाळीव श्वान देखील आहेत त्यांचे नाव साशा आणि हॅश आहेत. आता आणखी एक सदस्य तिच्या कुटुंबात सामील झाला आहे. समांथाने तिच्या किटीला मिठी मारणारा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून या फोटोमध्ये समांथा लाल रंगाचा नाईटसूट परिधान करून आहे. फोटो शेअर करताना समांथाने लिहिले - गिलोट्टो मॉर्निग टू यू ( Gelato morning to you), असे तिने लिहले आहे.

चाहत्यांनी केली कमेंट : समांथाच्या या पोस्टवर चाहते खूप कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले- अहाहा, तू किटी घेतलीस याचा मला खूप आनंद झाला. तर दुसऱ्या चाहत्याने तिला, पाळीव प्राणी हॅश आणि साशा दोघांची प्रतिक्रिया विचारली.

समंथा घेतला ब्रेक : सामांथाने अभिनयातून सध्या ब्रेक घेतला आहे. समांथाने नुकतेच 'सिटाडेल' या वेब सीरीजचे इंडियामधील शूटिंग पूर्ण केले आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा प्रोजेक्ट अमेरिकन स्पाय थ्रिलर 'सिटाडेल'ची हिंदी आवृत्ती आहे. या अमेरिकन व्हर्जनमध्ये प्रियांका चोप्रा आणि रिचर्ड मॅडन मुख्य भूमिकेत होते. याशिवाय सामंथा 'खुशी'मध्ये विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. हा एक तेलुगु चित्रपट आहे जो या वर्षी सप्टेंबरमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा एक रोमँटिक-कॉमेडी चित्रपट आहे.

हेही वाचा :

  1. Netflix sharing in India : भारतात पासवर्ड शेअरिंग करण्यावर नेटफ्लिक्सची बंदी
  2. Manipur sexual violence : अक्षय कुमार आणि उर्मिला मातोंडकरने मणिपूर लैंगिक अत्याचार विरुद्ध केला संताप व्यक्त...
  3. Student of the Year 3 : करण जोहरच्या 'स्टुटडंट ऑफ द इयर ३' मधून शनाया कपूर करणार ओटीटी पदार्पण, वाचा सविस्तर...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.