ETV Bharat / entertainment

विकी कौशलच्या अभिनयाचं कौतुक, मेघना गुलजारच्या दिग्दर्शनावर टीका

Sam Bahadur X reviews: विकी कौशल स्टारर 'सॅम बहादूर' हा चित्रपट शुक्रवारी रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'सोबत थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटातील विकी कौशलने साकारलेल्या भूमिकेचं लोक कौतुक करत आहेत. तर हा चित्रपट अधिक चांगला होऊ शकला असता असंही काहींना वाटतंय.

Sam Bahadur X reviews
विकी कौशलच्या अभिनयाचं कौतुक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 1, 2023, 12:13 PM IST

Updated : Dec 1, 2023, 12:25 PM IST

मुंबई - Sam Bahadur X reviews: डिसेंबर महिन्याची सुरुवात बॉक्स ऑफिसवरील रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्या चित्रपटाच्या संघर्षानं झाली. दोघांचे अनुक्रमे 'अ‍ॅनिमल' आणि 'सॅम बहादूर' हे चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाले. विकी कौशल अभिनीत सॅम बहादूर हा 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित एक बायोपिक युद्धपट आहे. मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

नेटिझन्सनं हा चित्रपट आवडल्याचं दिसतंय. चित्रपट 1 डिसेंबर रोजी संपूर्ण भारतात चित्रपटगृहात दाखल होताच, चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. विकी कौशलनं साकारलेला सॅम माणेकशॉ प्रेक्षकांनी स्वीकारल्याचं दिसत आहे. मात्र काहींनी मेघना गुलजारच्या दिग्दर्शनाला नावंही ठेवली आहेत. येथे काही X रिव्ह्यू देत आहोत.

  • Had high hopes from movie Sam bahadur watched it on thursday,Vicky Kaushal haa given his best but direction is not upto mark, movie feels like Documentary not stitched properly,lot of things are left for audience to understand.

    — Sunil (@imsunilvn) December 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रिलीजपूर्वी निर्मात्यांनी मुंबईत चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केलं होतं. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर आपली मते मांडली आहेत. 'जरा हटके जरा बचके' मधील विकी कौशलची सहकलाकार सारा अली खानने तिच्या सोशल मीडियावर चित्रपटातील विकीचा लूक पोस्टर शेअर केला आणि 'सॅम बहादूर'च्या टीमचं कौतुक करत एक लांबलचक चिठ्ठीही लिहिली आहे.

चित्रपट निर्माता करण जोहरनं विकी कौशलच्या सॅम बहादूरच्या उत्कृष्ट व्यक्तिरेखेवर प्रकाश टाकत चित्रपटाबद्दल आपले विचार मांडले आहेत. त्यांनी रॉनी आणि RSVP Movies च्या टीममधील सहकाऱ्यांचं उत्कष्ट निर्मितीबद्दल कौतुक केलं आहे. या चित्रपटासाठी केलेल्या संशोधनाची तारीफ करणनं केली आहे.

ज्येष्ठ चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी चित्रपटातील विकी कौशलच्या अभिनयाचं कौतुक केलं. फिल्म विश्लेषक सुमित कडील यांनी अ‍ॅडव्हान्स बुकिंगध्ये 45 हजार तिकीट विक्री झाल्याचं म्हटलंय. शुक्रवारी अंदाजे 8 कोटी रुपयांचे संकलन झालं आहे. चित्रपटाबद्दल लोक सकारात्मक प्रतिक्रिया देत आहे. सॅम बहादूर यांच्या व्यक्तिरेखेला विकी कौशलनं न्याय दिल्याची प्रतिक्रिया नेटिझन्सनी दिली आहे.

हेही वाचा -

1. देशभरात सर्वत्र 'अ‍ॅनिमल' मॅनिया, चाहत्यांनी ठरवलं ब्लॉकबस्टर

2. अंकिता लोखंडेनं मुनावर फारुकीपासून स्वतःला केलं दूर, तर खानजादीला सोडायचा आहे शो

3. 'अ‍ॅनिमल'च्या स्क्रिनिंगला रणबीरचा टी शर्ट घातलेल्या आलियाच्या उपस्थितीनं वेधलं सर्वांचं लक्ष

Last Updated : Dec 1, 2023, 12:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.