ETV Bharat / entertainment

Sam Bahadur teaser: मेघना गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादूर टीझर'मध्ये विकी कौशलवर खिळल्या सर्वांचा नजरा - फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ

विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला 'सॅम बहादूर' चित्रपटाचा टीझर अखेरीस रिलीज करण्यात आलाय. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात फातिमा सना शेख देखील इंदिरा गांधीच्या भूमिकेत आहे. ​​1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटात बहादूर यांच्या पत्नीची भूमिका सान्या मल्होत्रा साकारत आहे.

Sam Bahadur teaser
मेघना गुलजार दिग्दर्शित सॅम बहादूर टीझर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 13, 2023, 4:51 PM IST

मुंबई - विकी कौशलची करारी भूमिका असलेल्या 'सॅम बहादूर' चित्रपटाचा बहुप्रतिक्षित टीझर अखेर शुक्रवारी रिलीज झाला. मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेल्या 'सॅम बहादूर' चित्रपटाच्या टीझरमध्ये भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या विलक्षण जीवन आणि कारकीर्दीचं दर्शन घडतंय. या चित्रपटात दंगल स्टार्स अभिनेत्री फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'किपर' या नावानेही ओळखले जाणारे भारतीय लष्कराचे माजी प्रमुख सॅम माणेकशॉ यांची भूमिका विकी कौशलनं साकारली आहे. फातिमा सना शेख हिनं दीवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची आव्हानात्मक भूमिका साकारली आहे. सॅम बहादूरचा टीझर पाहिल्यानंतर दिग्दर्शिका मेघना गुलजार आणि विकी कौशल पुन्हा एकदा 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'राझी' चित्रपटाप्रमाणेच प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झालेत, असंच दिसतंय.

'सॅम बहादूर' टीझरच्या रिलीज नंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्साहाची लाट पसरली आहे. डिसेंबरमध्ये रिलीज होणाऱ्या चित्रपटांपैकी हा सर्वात उत्सुकता निर्माण करणारा एक चित्रपट ठरणार आहे. किचकट वाटणारं कथानक सहज आणि सुंदर पद्धतीनं रंजक करण्याची हातोटी मेघना गुलजार यांच्याकडं आहे. सॅम माणेकशॉ आणि इंदिरा गांधींच्या भूमिकेसाठी तिनं विकी कौशल आणि फातिमा सना शेख यांची निवड करुन हे आव्हान स्वीकारलं आहे. एकंदरीत सांगायचं तर 'सॅम बहादूर'चा टीझर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या विकीच्या शिरपेचात आणखी एक तुरा लावणारा ठरु शकतो.

फील्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशॉ यांना प्रेमानं सॅम बहादूर म्हणून ओळखले जातं. शौर्य आणि सन्मानाचे हे भारतात समानार्थी नाव समजलं जातं. त्यांची वैभवशाली लष्करी कारकीर्द चार दशकांहून अधिक काळ मोठी होती. याकाळात त्यांनी अतुलनीय धैर्य आणि नेतृत्वानं भारतीय लष्कराला वैभव प्राप्त करुन दिलं. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान माणेकशॉ यांनी त्यांचे नाव इतिहासाच्या इतिहासात कोरलं गेलं. त्याचे चतुर निर्णय आणि अविचल भावनेने भारताच्या जबरदस्त विजयाचा मार्ग मोकळा झाला आणि अखेरीस बांगलादेशची निर्मिती झाली. एक प्रिय लष्करी नेता म्हणून मानेकशॉ यांचा वारसा भारताच्या सामूहिक स्मृतीचा अविभाज्य भाग आहे. मेघना गुलजारनं त्यांचा जीवनपट आणि असाधारण प्रवास रुपेरी पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न केलाय.

हेही वाचा -

1. Mission Raniganj For Oscar Nomination : 'मिशन राणीगंज' चित्रपट ऑस्कर नॉमिनेशनसाठी पाठवण्याचा निर्मात्यांचा निर्णय

2. Pooja Hedge Currently Unavailable : पूजा हेडगे 'सध्या उपलब्ध नाही', पाहा तिच्या निवांत क्षणांची एक झलक

3. Vijay Varma Bags Best Actor India Award : विजय वर्मा ठरला भारताचा सर्वोत्कृष्ट अभिनेता, आशियाई अकादमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्समध्ये उठवली मोहोर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.