ETV Bharat / entertainment

Salman Khan And Arpita Khan : सलमान खानने बहीण अर्पिता खानला एक थ्रोबॅक फोटो शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या - थ्रोबॅक फोटो

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानची बहीण अर्पिता खानचा आज वाढदिवस आहे. या खास प्रसंगी भाईजानने एक थ्रोबॅक फोटो शेअर केला. त्याने त्याच्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Salman Khan And Arpita Khan
सलमान खान आणि अर्पिता खान
author img

By

Published : Aug 3, 2023, 12:56 PM IST

मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खान सध्या त्याच्या लोकप्रिय शो 'बिग-बॉस ओटीटी 2'मुळे सतत चर्चेत आहे. मात्र आता सध्या सलमान खान सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने एका सुंदर बाळासोबतचा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. सलमानने इंस्टाग्रामवर स्वतःचे आणि त्याची धाकटी बहीण अर्पिताचे एक सुंदर फोटो चाहत्यासोबत शेअर केला आहे. या फोटोच्या पोस्टवर त्याने लाल हार्ट आणि इमोजीसह कॅप्शनमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा बहिण अर्पिताला दिल्या आहेत. या गोंडस फोटोमध्ये अर्पिता खान सोफ्यावर बसलेल्या सलमान खानला प्रेमाने पाहत आहे. फोटोमध्ये सलमानने पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टवर काळ्या रंगाची प्रिंटेड लेदर जॅकेट घातलेली दिसत आहे. यासह त्याने डेनिमचा पॅन्ट परिधान केला आहे.

सलमानची पोस्ट आवडली चाहत्यांना : दरम्यान फोटोमध्ये अर्पिताने पांढऱ्या रंगाचा फ्रॉक घातला आहे. या फोटोमध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. सलमान खानने हा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हॅपी बर्थडे अर्पिता.' सलमान खान आणि अर्पिता खानचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे. याशिवाय फोटोमध्ये अर्पिता तिच्या भावाची करंगळी तोंडात धरून चावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सलमानच्या या पोस्टवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सलमानच्या पोस्टवर कमेंट करतांना एका चाहत्याने लिहले, 'ती खूप गोंडस आहे. अर्पिता वाढदिवसाच्या शुभेच्छा. इतर चाहत्यांनीही सलमाच्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सलमान खानचा वर्क फ्रंट: सलमान खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकताच त्याचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट प्रदर्शित झाला. ज्यामध्ये पूजा हेगडे, शहनाज गिल, राघव जुयाल आणि पलक तिवारी मुख्य भूमिकेत दिसले होते. यानंतर तो लवकरच त्याच्या आगामी चित्रपट टायगर ३ मध्ये दिसणार आहे. ज्यामध्ये तो पुन्हा कतरिना कैफसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. Manish Paul Birthday : मनीष पॉलच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक गोष्टी...
  2. Na Dho Mahanor passed away: मराठी मातीतला 'रानकवी' हरपला, म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ना. धो. महानोर यांना वाहिली श्रद्धांजली
  3. Guns & Gulaabs trailer out: राजकुमार राव, दुल्कर सलमानची मती गुंग करणारी गँगस्टर कॉमेडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.