मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान त्याची कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूरशी बऱ्याच काळापासून जोडला गेला आहे. अनेक समारंभात आणि पार्ट्यामध्ये ते एकत्र दिसले आहेत. शुक्रवारी, अबुधाबी येथील इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अवॉर्ड्स (IIFA) मध्ये युलिया वंतूरने तिची उपस्थिती लावली. इव्हेंटमधील एका व्हिडिओमध्ये, युलिया सलमान खानच्या चित्रपटांमधील अनेक हिट गाणी सादर करताना दिसत आहे. पोनीटेलमध्ये केस बांधलेल्या चमकदार ड्रेसमध्ये सजलेल्या, युलियाने 2014 च्या रिलीज झालेल्या किकमधील जुम्मे की रात आणि 2021 मध्ये रिलीज झालेल्या राधे मधील सीटी मार यासह इतर गाणी सादर केली. विशेष म्हणजे तिने नृत्याच्या ठेक्यावर ही गाणी स्वतः गायली. सिटी मार हे गाणे सादर करत असताना प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद देत तिला शिट्यांचा दणदणाट ऐकवला.
-
Are Baapre Bhabhi Performing on Jhume ki raat hai 🔥🔥🔥🔥🔥. U made my Day NJ 😂😂😂🤪🤪. There is no one close to bhabhi in our current generation 🙌🙌🙌. And bhai to pehle se latu hai but idhar koi maanta nahi mere alawa 🤣 https://t.co/nww9JG4gzl
— 𝑳𝑶𝑲𝑬𝑺𝑯🕺 (@LokeshGujju) May 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Are Baapre Bhabhi Performing on Jhume ki raat hai 🔥🔥🔥🔥🔥. U made my Day NJ 😂😂😂🤪🤪. There is no one close to bhabhi in our current generation 🙌🙌🙌. And bhai to pehle se latu hai but idhar koi maanta nahi mere alawa 🤣 https://t.co/nww9JG4gzl
— 𝑳𝑶𝑲𝑬𝑺𝑯🕺 (@LokeshGujju) May 26, 2023Are Baapre Bhabhi Performing on Jhume ki raat hai 🔥🔥🔥🔥🔥. U made my Day NJ 😂😂😂🤪🤪. There is no one close to bhabhi in our current generation 🙌🙌🙌. And bhai to pehle se latu hai but idhar koi maanta nahi mere alawa 🤣 https://t.co/nww9JG4gzl
— 𝑳𝑶𝑲𝑬𝑺𝑯🕺 (@LokeshGujju) May 26, 2023
आयफा रॉक्समधील युलियाच्या परफॉर्मन्सचा व्हिडिओ सलमानच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. आयफा २०२३ मधील लुलियाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत अनेक चाहत्यांची तिच्या कौतुकाच्या पोस्ट लिहिल्या आहेत. युलिया वंतूर ही रोमानियन गायिका आहे. आजवर तिने हिंदी गाण्यातही आपला हात आजमलवला आहे. गुरू रंधवासोबत तिने दोन वर्षापूर्वी मैं चला या गाण्यासाठी सहगायन केले होते. ती केवळ दिसायला सुंदर नाही तर प्रतिभाशालीही आहे. त्यामुले तिच्यावर सलमान भाळू शकतो हे नक्की आहे. गेल्या काही वर्षातील तिची सलमान सोबतची सलगी हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल.
युलिया वंतूर आणि सलमान खान अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. ती नेहमी त्याच्या कौटुंबिक कार्यक्रम आणि समारंभाचा एक भाग असते आणि अधूनमधून पार्ट्यांमध्येही त्याच्यासोबत सामील होते. यापूर्वी दोघेही सलमानच्या जवळच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत सुट्टीवर गेले होते.
दरम्यान, चित्रपटाच्या आघाडीवर, सलमान आगामी कॅटरिना कैफ आणि इमरान हाश्मीसोबत टायगर 3 चित्रपटामध्ये दिसणार आहे. तो अनीस बज्मी दिग्दर्शित नो एन्ट्रीच्या सिक्वेलमध्ये देखील दिसणार आहे. सुपरस्टार चॅम्पियन्सच्या रिमेकसाठी आमिर खानसोबतही असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा - Jr Nt Rs Monochrome Pictures : ज्यु. एनटीआरच्या फोटोशूटमधील मोनोक्रोम फोटोने सोशल मीडियावर वादळ