ETV Bharat / entertainment

Salman at Pooja Hegde brothers wedding: पूजा हेगडेच्या भावाच्या लग्नात सलमानची हजेरी, फोटो व्हायरल - पूजा हेगडे सलमानला डेट करत असल्याच्या चर्चा

बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि पूजा हेगडे लवकरच किसी का भाई किसी की जान या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. अलीकडेच, सलमान खान त्याची सहकलाकार पूजा हेगडेच्या भावाच्या लग्नात सहभागी झाला होता. या समारंभातील त्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आला आहे.

Salman at Pooja Hegde's brother's wedding

author img

By

Published : Feb 3, 2023, 9:53 AM IST

Updated : Feb 3, 2023, 10:04 AM IST

मुंबई - बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडेचा भाऊ ऋषभ हेगडेने 30 जानेवारी रोजी शिवानी शेट्टीशी लग्न केले. पूजाने तिच्या भावाच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या भावाच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान वधू-वरांसोबत पोज देताना दिसत आहे.

सलमान पूजा हेगडेचा भाऊ ऋषभच्या लग्नात मंगळुरूमध्ये पोहोचला होता. त्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अनेक सोशल मीडिया फॅन क्लबने फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये सलमान वधू-वरांसोबत पोज देताना दिसत आहे. ब्लॅक शर्ट आणि मॅचिंग पॅन्टमध्ये सलमान खान खूपच स्टायलिश दिसत आहे. दुसरीकडे, व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये पूजा लग्नाच्या कार्यक्रमात सलमानच्या 'छोटे छोटे भाईयों के बडे भैया' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पूजा हेगडे सलमानला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. मात्र यावर सलमान अथवा पूजाने कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मात्र इतक्या बिझी कामात गुंतलेल्या सलमानने मंगळूरु गाठून विवाह समारंभात हेजेरी लावणे याचा युजर्स पुन्हा तोच अर्थ काढत आहेत. यावेळी सलमान हेगडे परिवारासोबत खेळीमेळीच्या वातावरणात वावरत होता. त्याने फोटोला पोज देतानाचे भाव एका नव्या कुटुंबात सामील झाल्याचे आहेत.

आगामी कौटुंबिक मनोरंजनात्मक चित्रपट 'किसी का भाई किसी की जान'मध्ये सलमान खान आणि पूजा हेगडे पहिल्यांदाच स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहेत. निर्मात्यांनी नुकताच या चित्रपटाचा अधिकृत टीझर रिलीज केला आहे, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे. यंदाच्या ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे. शाहरुख खानच्या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट पठाणमध्ये सलमानने आपल्या खास एंट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सलमान आणि शाहरुखची जोडी पाहून प्रेक्षकांना खूप आनंद झाला.

सलमान खानच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, 2023 च्या दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात दाखल होणारा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट 'टायगर 3' मध्ये अभिनेता सलमान हा कॅटरिना कैफ सोबत दिसणार आहे. दुसरीकडे, पूजा अलीकडेच रणवीर सिंग आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्यासोबत 'सर्कस' या कॉमेडी चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांना प्रभावित करण्यात अपयशी ठरला होता.

हेही वाचा - K Viswanath Death : ख्यातनाम तेलुगू दिग्दर्शक के. विश्वनाथ यांचे निधन

Last Updated : Feb 3, 2023, 10:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.