ETV Bharat / entertainment

अर्पिता खानच्या घरी गणपती दर्शनासाठी सलमान खानसह विकी कॅटरिनाची हजेरी - Ganesh chaturthi 2022

सलमान खानची बहीण अर्पिता खानने गणेश चतुर्थीनिमित्त घरी पूजा आयोजित केली होती. यासाठी कॅटरिना कैफने पती विकी कौशलसोबत हजेरी लावली होती.

Etv Bharat
गणेश चतुर्थी
author img

By

Published : Sep 1, 2022, 11:30 AM IST

मुंबई - गणेश चतुर्थी (31 ऑगस्ट) निमित्त फिल्मी जगतात अनेक घडामोडी घडत असतात. यावेळी सेलिब्रिटींनी गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी केली. सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्मा हिने पती आयुष शर्मासोबत आपल्या घरी गणपतीबाप्पाचे स्वागत केले व साग्रसंगीत पूजा केली. सलमान खानसह त्याच्या संपूर्ण कुटुंबाने या पूजेला हजेरी लावली आणि बॉलिवूडमधील अनेक स्टार्सही अर्पिताच्या घरी गणपती पूजेला पोहोचले होते. यादरम्यान कॅटरिना कैफने पती विकी कौशलसोबत हजेरी लावली होती.

येथे सलमान खान पांढऱ्या शर्ट आणि डेनिममध्ये बहिण अर्पिताच्या घरी पूजा करण्यासाठी पोहोचला. सलमान खानने कुटुंबासोबत गणपतीची आरतीही केली, ज्याचा व्हिडिओ सलमान खानने चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

त्यावेळी गणपती पूजेमध्ये कॅटरिना कैफ आणि विकी कौशल या नवविवाहित जोडप्यावरही सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. कॅटरिना सुंदर सूट सलवार आणि विकी कौशल पिवळा कुर्ता आणि पांढऱ्या पायजामामध्ये गणेश पूजेसाठी पोहोचले होते.

याआधी अभिनेता रितेश देशमुख पत्नी जेनेलिया डिसूजा आणि दोन्ही मुलांसह अर्पिता खान शर्माच्या घरी पोहोचला होता. रितेश त्याच्या नवीन BMW इलेक्ट्रिक कारमध्ये येथे पोहोचला होता, ज्याची खूप चर्चा झाली होती.

अर्पिता खान शर्मा सुरुवातीपासूनच गणपतीची पूजा करत आली आहे. या पूजेत सलमान खानचे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले होते. अरबाज खान, सोहेल खान आणि सलमान खान या तिन्ही अभिनेत्यांची आई सलमा खान आणि बहीण अलविरा खानही येथे पूजा करताना दिसल्या.

हेही वाचा - Ganesh Chaturthi 2022 पुष्पा स्टाईल गणेश मूर्तीचे फोटो व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.