ETV Bharat / entertainment

Salman and Cristiano Ronaldo : सलमान खान आणि क्रिस्टियानो रोनाल्डोचा फोटो व्हायरल, सौदी अरेबियात झाली भेट - Salman Khan

Salman and Cristiano Ronaldo : सलमान खान आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांचा एक फोटो व्हायरल झालाय. त्यानंतर काहींनी सलमानकडे रोनाल्डोनं दुर्लक्ष केल्याचा दावा केला पण सलमान समर्थकांनी त्याची दुसरी बाजू दाखवत तो बॉलिवूडचा कसा श्रेष्ठ राजा आहे हे सांगितलं.

Salman and Cristiano Ronaldo
सलमान खान आणि क्रिस्टियानो रोनाल्डो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2023, 1:22 PM IST

मुंबई - Salman and Cristiano Ronaldo : बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान सध्या सोशल मीडियावर चित्रपटाशिवाय इतर कारणामुळे सध्या चर्चेत आहे. अलिकडे तो सौदी अरेबियात बॉक्सिंगचा सामना पाहण्यासाठी आला होता. विशेष म्हणजे हा सामना पाहण्यासाठी फुटबॉल लिजंड क्रिस्टियानो रोनाल्डोही आला होता. यावेळचे सलमान आणि रोनाल्डोचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. फोटो पाहून काहींनी असाही दावा केला की रोनाल्डोने उघडपणे सलमान खानकडे दुर्लक्ष केलंय.

  • • Never said anything bad about his exes
    • Always try to help everyone
    • Despite facing so much h@te and heartbreak, he keeps smiling
    • He is so huge that he didn't even look at the person sitting next to him
    Unbothered king of bollywood #SalmanKhan pic.twitter.com/83hhgeb3oi

    — Sia⋆ (@siappaa_) October 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मात्र त्यानंतर पुढच्याच क्षणी असे काही फोटो समोर आले ज्यात सलमान आणि रोनाल्डो एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. सलमान-रोनाल्डोच्या या फोटोंनी त्या उपद्रवी बातम्यांना पूर्णविराम मिळाला. आता पुढची एक बातमी सलमान बाबतीत समोर आली आहे.

खरतंर सिया नावाच्या एका एक्स युजरनं सलमान खान आणि रोनाल्डोचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून या यूजरनं सलमान खानच्या व्यक्तिरेखेचं ​​कौतुक केलंय. तिनं या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की त्यानं आपल्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल कधीच वाईट बोललेला नाही. तो नेहमी लोकांच्या मदतीसाठी पुढे येतो, द्वेष आणि तिरस्काराचा सामना करूनही तो हसत राहतो. त्याच्यासोबत बसलेल्या व्यक्तीकडं तो वळूनही पाहात नाही. तो बॉलिवूडचा संयमी आणि शांत किंग आहे.

अलीकडेच रियाध सौदी अरेबिया येथे पार पडलेल्या टायसन फ्युरी आणि फ्रान्सिस नगानौ यांच्यातील बॉक्सिंग सामन्यासाठी सलमान खान हजर होता. यावेळी त्यानं लोकप्रिय फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि त्याची जोडीदार जॉर्जिना रॉड्रिग्ज यांच्या शेजारी बसून खेळाचा आनंद घेतला. एकाच फ्रेममधील दोघांचे व्हिडिओ आणि फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले नाहीत तरच नवल. चाहत्यांनी या दोघांना एकत्र पाहून आपला आनंद सोशल मीडियावर व्यक्त करयला सुरुवात केली.

सलमान खानच्या वर्कफ्रंटचा विचार करता तो त्याच्या 'टायगर 3' या अ‍ॅक्शन चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये कतरिना कैफ पुन्हा एकदा त्याच्यासोबत अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे १२ दिवस उरले आहेत. हा चित्रपट 12 नोव्हेंबरला दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित होणार आहे. मनीष शर्मानं दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा -

1. Dunki Teaser : शाहरुख खानच्या वाढदिवसाला 'डंकी'चा टीझर होईल प्रदर्शित....

2. Kennedy received a standing ovation : 'मामी'मध्ये सनी लिओनीच्या 'केनेडी'ला मिळाले स्टँडिंग ओव्हेशन!

3. Fighter Last Shoot : हृतिक रोशन स्टारर 'फायटर' चित्रपटाचं शूटिंग लवकरच होणार पूर्ण...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.