ETV Bharat / entertainment

'सालार' सक्सेस पार्टीत प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन यांनी दिग्दर्शक प्रशांत नीलसोबत कापला केक - सालार चित्रपट

Salaar Success Party : साऊथ अभिनेता प्रभास अभिनीत 'सालार'चं यश पाहून चित्रपटाच्या निर्मात्यांनी सक्सेस पार्टीचं आयोजन केलं. या पार्टीमध्ये 'सालार'ची संपूर्ण टीम उपस्थित होती.

Salaar Success Party
सालार सक्सेस पार्टी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2024, 5:31 PM IST

मुंबई - Salaar Success Party : साऊथ सुपरस्टार प्रभास स्टारर 'सालार' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटानं 17 दिवसात जगभरात 667.59 कोटीची कमाई केली आहे. देशांतर्गत हा चित्रपट कमाईच्या बाबतीत 400 कोटींच्या जवळपास पोहचला आहे. 'सालार'चं यश पाहून चित्रपट निर्मात्यांनी सक्सेस पार्टीचं आयोजन केलं. यानंतर या चित्रपटाच्या निर्माते आणि स्टार कास्टनं 'सालार'च्या यशासाठी केक कापला. 8 जानेवारी रोजी हा चित्रपट रिलीजच्या 18 व्या दिवसात आहे. 'सालार'च्या सक्सेस पार्टीमधील काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

'सालार'ची सक्सेस पार्टी : 'सालार'च्या सक्सेस पार्टीमध्ये प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन आणि चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील केक कापताना दिसत आहेत. या केकवर ब्लॉकबस्टर 'सालार' लिहिलं आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये चित्रपटाची संपूर्ण टीम हा आनंदोत्सव साजरा करत आहे. 'सालार'च्या सक्सेस पार्टीत प्रत्येकजण ब्लॅक आउट फिटमध्ये दिसत आहेत. आनंदोत्सव साजरा करताना प्रभास हसताना दिसत आहे. तब्बल 7 वर्षांनंतर प्रभासचा हा चित्रपट हिट झाला आहे. प्रभासचे यापूर्वी 'साहो', 'राधे श्याम' आणि 'आदिपुरुष' यासारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले आहे. 'सालार' आता देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.

'सालार' बॉक्स ऑफिस कलेक्शन : 2023 मधील सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट असलेल्या 'सालार'नं जगभरात 178.7 कोटी रुपयांचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला होता. या चित्रपटानं आतापर्यंत देशांतर्गत 393.25 कोटीची कमाई केली आहे. हा चित्रपट आगामी काळात देशांतर्गत 400 कोटींच्या क्लबमध्ये दाखल होणार आहे. दरम्यान प्रभासच्या वर्क्रफंटबद्दल बोलायचं झालं पुढं तो 'स्पिरिट', 'राजा डिलक्स' आणि कन्नप्पा या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय तो ' 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन, दिशा पटानी, डलकर सलमान राणा डग्गुबती आणि गौरव चोपडासोबत दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. आशियाई चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक रमेश सिप्पींचा 'एशियन कल्चर'पुरस्काराने होणार गौरव
  2. केजीएफ स्टार यशच्या बर्थडे निमित्त मोठा कट-आउट उभारताना अपघात, तिघांचा मृत्यू
  3. विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदान्ना फेब्रुवारीमध्ये करणार साखरपुडा?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.