मुंबई - Salaar Movie : साऊथ अभिनेता प्रभास स्टारर 'सालार' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. 22 डिसेंबर रोजी 'सालार' चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला. प्रभासचा चालू वर्षात 'आदिपुरुष' हा चित्रपट खूप वाईटरित्या फ्लॉप झाला होता. आता त्यानंतर प्रभासनं 'सालार' चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर कमबॅक केलं आहे. या चित्रपटाला रुपेरी पडद्यावर रिलीज होऊन आठ दिवस पूर्ण झाली आहेत. आता हा चित्रपट रिलीजच्या नव्या दिवसात आहे. प्रभासशिवाय 'सालार'मध्ये मीनाक्षी चौधरी, श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन, जगपती बाबू, टिन्नू आनंद आणि इतर कलाकार आहेत.
-
#Salaar WW Box Office
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) December 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
#Prabhas' #SalaarCeaseFire
Completes WEEK 1 on a fantastic note.
Day 1 - ₹ 176.52 cr… pic.twitter.com/JyuT4uFyF0
">#Salaar WW Box Office
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) December 29, 2023
#Prabhas' #SalaarCeaseFire
Completes WEEK 1 on a fantastic note.
Day 1 - ₹ 176.52 cr… pic.twitter.com/JyuT4uFyF0#Salaar WW Box Office
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) December 29, 2023
#Prabhas' #SalaarCeaseFire
Completes WEEK 1 on a fantastic note.
Day 1 - ₹ 176.52 cr… pic.twitter.com/JyuT4uFyF0
सालारची बॉक्स ऑफिस एकूण कमाई : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'सालार' चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 90.7 कोटीची कमाई केली. यानंतर या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 56.35 कोटी, तिसऱ्या दिवशी 62.05 कोटी, चौथ्या दिवशी 46.3 कोटी, पाचव्या दिवशी 24.9 कोटी, सहाव्या दिवशी 15.6 कोटी, सातव्या दिवशी 12.1 कोटी, आठव्या दिवशी 10 कोटीची कमाई केली आहे. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 318 कोटी झालं आहे. जगभरात या चित्रपटाचं 542.63 कोटीचं कलेक्शन केलं आहे. दरम्यान हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 1000 कोटी कमाई करेल, असं सध्या दिसत आहे. आता देखील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत आहे. प्रभास या चित्रपटामध्ये अॅक्शन मोडमध्ये दिसला आहे.
'सालार' चित्रपटाची बॉक्स ऑफिस कमाई
पहिला दिवस पहिला शुक्रवार - 90.7 कोटी
दुसरा दिवस पहिला शनिवार - 56.35 कोटी
तिसरा दिवस पहिला रविवार - 62.05 कोटी
चौथा दिवस पहिला सोमवार - 46.3 कोटी
पाचवा दिवस पहिला मंगळवार - 24.9 कोटी
सहावा दिवस पहिला बुधवार - 15.6 कोटी
सातवा दिवस पहिला गुरुवार- 12.1 कोटी
आठवडा 1 कलेक्शन - 308 कोटी
आठवा दिवस दुसरा शुक्रवार - 10 कोटी
बॉक्स ऑफिस एकूण कलेक्शन - 318 कोटी
हेही वाचा :