Salaar Box Office Collection day 19 : साऊथ स्टार प्रभासनं एक मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे. 'सालार' चित्रपटानं जगभरात 700 कोटीचा व्यवसाय केला आहे. प्रभासनं अनेक दाक्षिणात्य कलाकारांना मागे टाकत हा मोठा विक्रम सर केला. प्रभास स्टारर हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रचंड कमाई करताना दिसत आहे. चित्रपट आता 700 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. याबद्दल माहिती चित्रपट तज्ञ मनोबल विजयबालन यांनी दिली आहे. याशिवाय त्यांनी प्रभासच्या एका मोठ्या अचिव्हमेंटबद्दलही सांगितलं आहे.
-
BREAKING: Global Star #Prabhas' #SalaarCeaseFire ZOOMS past ₹7️⃣0️⃣0️⃣ cr gross mark at the WW Box Office.
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) January 9, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Prabhas becomes the only star from south to HOLD… pic.twitter.com/2kmSWpM4r4
">BREAKING: Global Star #Prabhas' #SalaarCeaseFire ZOOMS past ₹7️⃣0️⃣0️⃣ cr gross mark at the WW Box Office.
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) January 9, 2024
Prabhas becomes the only star from south to HOLD… pic.twitter.com/2kmSWpM4r4BREAKING: Global Star #Prabhas' #SalaarCeaseFire ZOOMS past ₹7️⃣0️⃣0️⃣ cr gross mark at the WW Box Office.
— Manobala Vijayabalan (@ManobalaV) January 9, 2024
Prabhas becomes the only star from south to HOLD… pic.twitter.com/2kmSWpM4r4
700 कोटी कमाईची हॅट्रीक : प्रभास हा पहिला साऊथ अभिनेता आहे, ज्याच्या 3 चित्रपटांनी 700 कोटींचा गल्ला पार केला आहे. भारतात हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्येही सामील होऊ शकलेला नाही. मात्र लकरच हा चित्रपट 500 कोटीचं लक्ष पार करेल अशी अपेक्षा केली जात आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, मंगळवारी या चित्रपटानं 2.15 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटानं देशांतर्गत एकूण 397.80 कोटीची कमाई केली आहे. प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगातील सर्वाधिक कमाई करणार्या चित्रपटांच्या टॉप 5मध्ये आला आहे. या यादीत रजनीकांतचा चित्रपट 2.0, यशचा चित्रपट 'केजीएफ चॅप्टर 2', एसएस राजामौलीचा चित्रपट 'आरआरआर' आणि 'बाहुबली 2' यांचाही समावेश आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'सालार' चित्रपटाची स्टार कास्ट : या चित्रपटामध्ये प्रभास व्यतिरिक्त, पृथ्वीराज सुकुमारन, रेड्डी श्रिया, मीनाक्षी चौधरी, श्रुती हासन, जगपती बाबू, टीनू आनंद यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. 'सालार'ची कहाणी एका गँग लीडरवर आधारित आहे. हा चित्रपट शाहरुख खानच्या 'डंकी'ला टक्कर देत आहे. या चित्रपटामध्ये प्रभास हा अॅक्शन मोडमध्ये दिसला आहे. चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये आजही प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. 'सालार' चित्रपट जगभरात 1000 कोटीचं लक्ष गाठणार की नाही हे येणाऱ्या काही दिवसात समजेल.
हेही वाचा :