ETV Bharat / entertainment

सैयामी खेर 'फाडू' मालिकेत साकारणार मराठमोळी भूमिका

author img

By

Published : Dec 1, 2022, 10:52 AM IST

'फाडू- अ लव्ह स्टोरी' या आगामी स्ट्रीमिंग मालिकेतील तिच्या मंजीरी या व्यक्तीरेखेतून सैयामी खेर आपल्या मूळ मराठीपणाकडे वळली आहे. या भूमिकेतून ती पुन्हा एकदा आपल्या मूळ महाराष्ट्रीयन व्यक्तीरेखेला न्याय देणार आहे. सैयामी ही मराठी भाषिक कुटुंबातील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री उषा किरण यांची नात आहे.

सैयामी खेर
सैयामी खेर

मुंबई - 'फाडू- अ लव्ह स्टोरी' या आगामी ओटीटीवरील स्ट्रीमिंग मालिकेत अभिनेत्री सैयामी खेरने मराठी मुलीची भूमिका साकराली आहे. या भूमिकेतून ती पुन्हा एकदा आपल्या मूळ महाराष्ट्रीयन व्यक्तीरेखेला न्याय देणार आहे. सैयामी ही मराठी भाषिक कुटुंबातील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री उषा किरण यांची नात आहे.

अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित, 'फाडू- अ लव्ह स्टोरी' ही नवी वेब मालिका आधुनिक जीवनातील आव्हाने आणि गोंधळांवर आधारित आहे. याबद्दल बोलताना, अभिनेत्री म्हणाली: "मला आठवतं की अश्विनी मॅडम (अश्विनी अय्यर तिवारी, दिग्दर्शक) यांनी माझ्या ऑडिशन्स पाहिल्यानंतर, आमची पहिली मीटिंग झूमवर होती, तेव्हा मी माझ्या शेतात बसले होते. अश्विनी मॅडमने हे सांगितलेकी ही तीच मंजीरी आहे. मंजरी नेमकी कोण आहे ते मला तुझ्यात दिसत आहे. 'फाडू' मधील माझी व्यक्तिरेखा निसर्गाच्या कुशीत वाढलेली, प्रत्येक गोष्टीत कविता शोधणारी आहे. खऱ्या आयुष्यात मी कोण आहे, याच्या अगदी जवळ आहे. मी एका महाराष्ट्रीयनची भूमिका केली आहे. आणि मराठी ही माझी मातृभाषा असल्यामुळे, माझ्या पात्रात रस भरणे इतके अवघड नव्हते."

अभिनेत्रीने तिला अशा प्रकारचे पात्र साकारण्याची संधी दिल्याबद्दल दिग्दर्शकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. "मी अश्विनी मॅडमची मनापासून आभारी आहे कारण गो या शब्दापासून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला या गोष्टीसाठी पाठिंबा दिला. तिने मला माझ्या सर्वात आवडत्या चार्टर्सपैकी एक दिला आहे. मला पावेलसोबत काम करायला मिळाल्याचा मला खूप आनंद झाला आहे. 'थप्पड'मध्ये मला तो आवडला होता आणि त्याच्यासोबत काम केल्याने माझे आयुष्य सोपे झाले कारण तो खूप अनुभव देणारा ,हकलाकार आहे. 'फाडू' ने मला खूप काही शिकवले आहे. माझ्या सर्वात खास प्रोजेक्ट्समध्ये हा एक आहे," असे सैयामी पुढे म्हणाली.

सौम्या जोशी यांनी लिहिलेल्या या वेबसीरिजमध्ये पावेल गुलाटी यांचीही भूमिका आहे आणि ही मालिका लवकरच सोनी LIV वर ९ डिसेंबर रोजी प्रसारित होईल.

हेही वाचा - शहनाज गिलला विकी कौशल वाटतो "फॅमिली" मेंबर, चॅट शोसाठी दोघे आले एकत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.