ETV Bharat / entertainment

‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू चा नवीन चित्रपट ‘आठवा रंग प्रेमाचा’! - खुशबू सिन्हा यांचे दिग्दर्शन

सैराट फेम रिंकू राजगुरूचा (Rinku Rajguru New Movie) नवीन चित्रपट येत आहे. या चित्रपटात रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत असून विशाल आनंद हा नवीन अभिनेता चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

athava rang premacha
आठवा रंग प्रेमाचा’
author img

By

Published : Apr 25, 2022, 9:08 AM IST

मुंबई : समीर कर्णिक यांनी “क्यूँ हो गया ना.." या आपल्या पहिल्याच चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून छाप सोडली होती. त्यानंतर "यमला पगला दिवाना", "चार दिन की चांदनी", "हिरोज", "नन्हे जैसलमेर" अशा उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. आता ते निर्माता म्हणून मराठीत पदार्पण करीत असून त्यांच्या या पहिल्या मराठी चित्रपटाचे नाव आहे, ‘आठवा रंग प्रेमाचा’. या चित्रपटात ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत असून विशाल आनंद हा नवीन अभिनेता चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय.

नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या पोस्टर मध्ये रिंकू आणि आनंद एकमेकांच्या मिठीत असून हे प्रेमकहाणी तर असणारच हे कळतेय परंतु पोस्टरवरील लाल रंग अजूनही काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतोय. रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास निर्माते समीर कर्णिक यांनी व्यक्त केला. चिरंतन राहणाऱ्या प्रेम या संकल्पनेवर आधारित ‘आठवा रंग प्रेमाचा’ हा चित्रपट असून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आठवा रंग प्रेमाचा
अ टॉप अँगल प्रॉडक्शनच्या समीर कर्णिक यांनी ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटाची निर्मिती केली असून आदिनाथ पिक्चर्सच्या आशिष भालेराव, राकेश राऊत प्रॉडक्शन्स यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांचे असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. रिंकू राजगुरू सोबत विशाल आनंद हा नव्या दमाचा अभिनेता या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.
हेही वाचा - Ti and Shala : अजाण, अल्लड वयातल्या ‘त्या’ भावना अधोरेखित करणारी वेब सिरीज 'ती आणि शाळा’

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.