ETV Bharat / state

अमरावतीत पोलीस ठाण्यावर दगडफेक करणाऱ्यांची धरपकड; बाराशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Stone Pelting Amravati

अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर शुक्रवारी रात्री जमावानं दगडफेक केली होती. याप्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Nagpuri Gate Police Station
पोलीस ठाण्यावर दगडफेक (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2024, 6:44 PM IST

Updated : Oct 5, 2024, 7:00 PM IST

अमरावती : उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथे यती स्वामी नरसिंह महाराज यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात अल्पसंख्याक समुदायातील काही व्यक्तींनी शुक्रवारी दुपारी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी सायंकाळी या प्रकरणात गुन्हा नोंदवला होता. असं असताना आपल्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली नाही, अशी अफवा पसरवून वीस ते पंचवीस जणांचा मोठा जमाव पोलीस ठाण्याच्या परिसरात एकत्र आला. पोलिसांना काही कळायच्या आतच पोलीस ठाण्यावर या जमावानं दगडफेक केली.

बाराशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल : या प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी एकाला अटक केली, तर शनिवारी सकाळी आठ जणांना ताब्यात घेतलं. शनिवारी दुपारी देखील पठाण चौक, लालखडी आदी भागात दगडफेक करणाऱ्यांना अटक करण्याची मोहीम पोलिसांनी राबवली. एकूण 26 जण या प्रकरणात मुख्य आरोपी असून, बाराशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर दगडफेक (ETV Bharat Reporter)

मुख्य आरोपीला होणार लवकरच अटक : नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर दगडफेक झाल्यानंतर पोलीस उपायुक्त सागर पाटील हे पोलीस ठाण्यातच ठाण मांडून आहेत. या प्रकरणात मुख्य आरोपी हा सय्यद जुबेर असून, त्याला लवकरच अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत पोलिसांच्या एकूण दहा गाड्यांची तोडफोड झाल्याची माहिती, पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली. तर या घटनेत जवळपास 21 पोलीस जखमी झाले आहेत.

पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमावबंदी : दगडफेकीच्या गंभीर घटनेनंतर पोलीस आयुक्त नवीन चंदन रेड्डी यांनी नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमाबंदीचे आदेश दिलेत. नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमावबंदी लागू असताना शाळा आणि दुकान सुरू आहेत. "आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. अटक करण्यात आलेल्या एका व्यक्तीला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणात अनेकांना अटक केली जाईल," असं पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी सांगितलं.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी एकूण 17 फिक्स पॉईंट लावले आहेत. तर परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला.

हेही वाचा -

  1. अमरावतीत पोलीस ठाण्यावर दगडफेक; पोलिसांचा लाठीचार्ज, जमाव बंदीचा आदेश - Stone pelting On Police Station
  2. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलेची चोरली साखळी, विरोध करणाऱ्या माणसावर चोरट्याकडून गोळीबार - cctv video of chain snatcher
  3. पोलिसांनी लाठीचार्ज करून 10 तासानंतर आंदोलकांना पांगवले, आंदोलकांकडूनही दगडफेक - Badlapur School Case

Last Updated : Oct 5, 2024, 7:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.