हैदराबाद - साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई पल्लवीच्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीने 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटात दाखविलेल्या काश्मिरी पंडितांच्या पलायनाची तुलना एका घटनेशी केली आहे, ज्यानंतर अभिनेत्रीच्या विरोधात जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. काश्मिरी हिंदूंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी साई पल्लवीवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
काश्मिरी पंडितांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे अभिनेत्रीविरोधात हैदराबादमधील पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. खरं तर, एका यूट्यूब चॅनेलशी झालेल्या संभाषणात, 'द काश्मिरी फाइल्स'ने 'काश्मिरी पंडितांचे पलाीयन' दाखवले होते आणि या हत्याकांडाची तुलना गायींची तस्करी करणाऱ्या मुस्लिम ड्रायव्हरच्या लिंचिंगशी केली. सई पल्लवीने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटात त्यावेळी काश्मिरी पंडितांना कसे मारले गेले हे पाहिले आहे.
ती पुढे म्हणाली, ''जर तुम्ही या विषयाकडे धार्मिक संघर्ष म्हणून पाहत असाल, तर नुकतीच एक घटना घडली ज्यामध्ये गाय घेऊन जाणाऱ्या एका मुस्लिम चालकाला मारहाण करण्यात आली आणि जबरदस्तीने 'जय श्री राम'चा नारा लावण्यास भाग पाडले गेले. मग या दोन घटनांमध्ये काय फरक आहे''. सोशल मीडियावर साई पल्लवीच्या वक्तव्यावर युजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. काही युजर्सनी तिच्या धाडसाचे कौतुकही केले आहे.
हेही वाचा - प्रियंकाची आई मधु चोप्राचा वाढदिवस, आजीच्या मांडीवर दिसली प्रियंकाची लेक