मुंबई : संदीप सिंग दिग्दर्शित 'सफेद' चित्रपटाचा टीझर २७ जुलै २०२३ रोजी प्रदर्शित झाला आहे. 'सफेद' या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर आणि एका विधवा महिलेची प्रेमकथा दाखवली आहे. या चित्रपटात मीरा चोप्रा आणि अभय वर्मा हे प्रमुख कलाकार आहेत. 'सफेद' चित्रपटाचा टीझर रिलीज केल्यानंतर संदीप सिंहने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहले, 'जगातील लोकांवर चमकणाऱ्या दागिन्यांचा प्रकाश आहे... बनारसची काळे-चांदी देखील प्रसिद्ध आहे'. 'सफेद'चे पहिले पोस्टर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट खूप चर्चेत होता. या चित्रपटामध्ये एक वेगळी कहाणी पाहायला प्रेक्षकांना मिळणार आहे.
'सफेद' चित्रपटात अभय वर्मा केली ट्रान्सजेंडरची भूमिका : 'सफेद' चित्रपटात ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणारा अभिनेता अभय वर्मा म्हणतो, 'चॉकलेट बॉयच्या प्रतिमेसह, मी मॉडेल आणि अभिनेता म्हणून अनेक जाहिराती आणि वेब शोमध्ये काम केले आहे. माझ्या पहिल्याच चित्रपटात मी ट्रान्सजेंडर म्हणून काम केले आहे. चंडी' ही भूमिका करताना मला एकप्रकारे संकोच वाटत होता. पण संदीपने मला पूर्ण आत्मविश्वासाने भूमिका साकारण्यासाठी प्रोत्साहन दिले. ही व्यक्तिरेखा ज्या पद्धतीने लिहिली गेली आहे आणि मांडली गेली आहे त्याने मला हादरवून सोडले होते'.
- या चित्रपटात एका विधवेची भूमिका करणारी मीरा चोप्रा सांगितले, 'संदीपने दिलेली स्क्रिप्ट वाचून मी भारावून गेले होते. दिग्दर्शक म्हणून संदीपचा हा पहिलाच चित्रपट असल्याने मी थोडी घाबरली होते, पण शूटिंग सुरळीत पार पडली. शूटिंगच्या पहिल्याच दिवसापासून मला खात्री होती की, मी सुरक्षित हातात आहे. एका विधवेची वेदना आणि प्रवास या चित्रपटात संदीपने प्रभावीपणे मांडला आहे.'
- 'सफेद' चित्रपटात अभय वर्मा आणि मीरा चोप्रा यांच्या व्यतिरिक्त बरखा बिश्त, जमील खान आणि छाया कदम हे देखील कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात सोनू निगम, रेखा भारद्वाज, शिल्पा राव, शैल हाडा, शशी सुमन, जाझिम शर्मा आणि सुवर्णा तिवारी यांनी गायलेली सात गाणी आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा :
Gadar 2 New Poster Released : सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर चित्रपट 'गदर २'चे दुसरे पोस्टर रिलीज...
Gadar 2 New Poster Released : सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर चित्रपट 'गदर २'चे दुसरे पोस्टर रिलीज...