मुंबई - ऑस्कर पुरस्कार 2023 च्या अंदाज यादीमध्ये अभिनेता रामचरण आणि ज्यूनियर एनटीआरचे नाव असल्याची चर्चा काही आठवड्यापूर्वी रंगली होती. मात्र भारताच्या वतीने अधिकृत पाठवण्यात आलेल्या चित्रपटात आरआरआरचा समावेश होऊ शकला नव्हता. त्यामुळे चाहते खूप निराश झाले होते. मात्र चित्रपटाला जगभर प्रचंड प्रेम मिळत असून हा चित्रपट ऑस्करसाठी जावा अशी चाहत्यांची इच्छा होती. अखेर आरआरआरच्या टीमने वैयक्तिक श्रेणींसाठी केले आहे.
-
CONFIRMED... 'RRR' APPLIES FOR INDIVIDUAL CATEGORIES AT OSCARS... Team #RRRMovie are optimistic about their chances and have applied for *individual categories* at the #Oscars... Here's a heartfelt note from Team #RRR...#RRRForOscars pic.twitter.com/tnCmG9yvI8
— taran adarsh (@taran_adarsh) October 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">CONFIRMED... 'RRR' APPLIES FOR INDIVIDUAL CATEGORIES AT OSCARS... Team #RRRMovie are optimistic about their chances and have applied for *individual categories* at the #Oscars... Here's a heartfelt note from Team #RRR...#RRRForOscars pic.twitter.com/tnCmG9yvI8
— taran adarsh (@taran_adarsh) October 6, 2022CONFIRMED... 'RRR' APPLIES FOR INDIVIDUAL CATEGORIES AT OSCARS... Team #RRRMovie are optimistic about their chances and have applied for *individual categories* at the #Oscars... Here's a heartfelt note from Team #RRR...#RRRForOscars pic.twitter.com/tnCmG9yvI8
— taran adarsh (@taran_adarsh) October 6, 2022
''पक्कं ठरलं!!... 'RRR' हा चित्रपट ऑस्करमध्ये वैयक्तिक श्रेणींसाठी अप्लाय करण्यात आला आहे. या चित्रपटाची टीम या संधीबद्दल आशावादी असून वैयक्तिक श्रेणींसाठी अप्लाय केला आहे. टीमने एक ह्रदयस्पर्शी निवेदन प्रसिध्द केले आहे.'', असे तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे. ही बातमी कळताच रामचरण, ज्यू. एनटीआर आणि एसएस राजामौली यांचे चाहत्यांना आनंद झाला आहे.
स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनुसार, 3 तास 2 मिनिटांचा रनटाइम असलेला RRR (हिंदी) चित्रपट जगभरात "45 दशलक्ष तासांपेक्षा जास्त" पाहिला गेला आहे. "RRR आता जगभरातील Netflix वर सर्वात लोकप्रिय भारतीय चित्रपट ठरला आहे," असे नेटफ्लिक्सने ट्विटरवर जाहीर केले होते .
मॅंडी (2018) आणि द विचर: ब्लड ओरिजिन (2022) या हॉलिवूड साठी ओळखले जाणारे दिग्दर्शक-लेखक आरोन स्टीवर्ट आह्न यांनी ट्विटरवर राम चरणसाठी चित्रपट लिहिण्याची इच्छा व्यक्त व्यक्त केली होती. “राम चरण सारख्या ग्रेट अॅक्टरसाठी चित्रपट लिहायला आवडेल. पण त्याने जर आंतरराष्ट्रीय प्रॉडक्शनसाठी काम करायचे असेल तर त्याने मुख्य अभिनेता म्हणून केले पाहिजे. अशी संधी सहसा हॉलिवूड देत नाही. मी इथे आणखी काही उत्कृष्ट भारतीय चित्रपटांसाठी आलो आहे,” असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
जुलैमध्ये, डॉक्टर स्ट्रेंज आणि ड्यून सारख्या हॉलीवूड ब्लॉकबस्टर्सचे लेखक, जॉन स्पाइहट्स यांनी देखील आरआरआर चित्रपटाबद्दल त्यांचे विचार ट्विटरवर शेअर केले होते. जॉनने लिहिले होते, “होली हेल, आरआरआर. याआधी एका चित्रपटात इतके चित्रपट पॅक करण्याची हिंमत कोणी केली आहे? काय राईड आहे. इतक्या दिवसानंतरही मी त्याचाच विचार करतोय."
तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये डब केलेला हा पॅन इंडिया चित्रपट म्हणून ओळखला जाणारा हा चित्रपट, 1920 च्या दशकातील दोन भारतीय क्रांतिकारकांभोवती विणलेल्या स्वातंत्र्यपूर्व काल्पनिक कथेचा इतिहास आहे. 2022 मधील सर्वात यशस्वी भारतीय चित्रपटांपैकी एक असलेल्या RRR ने जगभरात बॉक्स ऑफिसवर रु. 1,200 कोटींची कमाई केली आहे. अभिनेता राम चरण आणि ज्यूनियर एनटीआर यांच्या यात मुख्य भूमिका होत्या. तसेच आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट IMAX, IMAX 3D, 3D आणि डॉल्बी सिनेमा फॉरमॅटमध्ये प्रदर्शित झाला होता. "RRR" चित्रपटाच्या तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड आवृत्त्यांनाही भरपूर प्रतिसाद मिळाला होता.
हेही वाचा - साजिद खान बिग बॉसमध्ये सामील झाल्यामुळे भडकली उर्फी जावेद