ETV Bharat / entertainment

Rozlyn Khan : अभिनेत्री रोझलिन खान कॅन्सरने ग्रस्त, हॉस्पिटलमधून शेयर केली 'ही' इमोशनल पोस्ट - Rozlyn Khan battling cancer

आयपीएल आणि पेटा साठी काम केलेल्या या अभिनेत्रीला कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. (Rozlyn Khan cancer). हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर करून अभिनेत्रीने एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. (Rozlyn Khan Instagram).

Rozlyn Khan cancer
Rozlyn Khan cancer
author img

By

Published : Nov 12, 2022, 6:28 PM IST

Updated : Nov 12, 2022, 7:15 PM IST

हैदराबाद - मॉडेल आणि अभिनेत्री रोझलिन खानबाबत (Rozlyn Khan) धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने सांगितले की तिला कॅन्सर आहे आणि तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Rozlyn Khan cancer). रोझलिनने हॉस्पिटलच्या बेडवरून एक फोटोही शेअर केला आहे. या पोस्टसोबतच एक इमोशनल संदेशही शेअर केला आहे. (Rozlyn Khan Instagram).

रोझलिन खानची हृदयस्पर्शी पोस्ट - रोझलिनने सोशल मीडियावर एक मार्मिक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, 'कठीण लोकांचे जीवन सोपे नसते. मी हे कुठेतरी वाचले होते. पण आता मला कळले की हे माझ्यासारख्या लोकांसोबत का घडते. तो त्याच्या सर्वात बलवान सैनिकांना सर्वात कठीण लढा लढायला देत असतो. हा माझ्या आयुष्यातील एक निर्णायक अध्याय असू शकतो. मला विश्वास आणि आशा आहे की प्रत्येक अडचणीने मला मजबूत बनवले आहे. हा अनुभव देखील मला आणखी मजबूत करेल.'

जे काही घडते ते चांगल्यासाठीच घडते - 'माझ्यासोबत काही सुंदर लोक आहेत जे माझ्यासाठी प्रार्थना करतात. जे काही घडते ते चांगल्यासाठीच घडते आणि ते चांगलेच मी आहे. मला मान आणि पाठीच्या तीव्र वेदनांशिवाय कोणतीही समस्या नव्हती. मला त्या जिम्नॅस्टिक आणि पाठदुखीच्या वेदना वाटल्या. बरे झाले हे लवकरच कळले. पुढील पोस्टमध्ये रोझलिनने ती काम करत असलेल्या ब्रँड्सना सांगितले की ती काम करण्यासाठी सदैव उपस्थित असेल. तीचा आजार कामाच्या आड येणार नाही. ती शेवटच्या क्षणापर्यंत काम करेल.

मी काम करतच राहील - रोझलिनने पुढे लिहिले की, 'प्रिय ब्रँड्स, मी दर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुमच्यासोबत शूट करायला तयार आहे. कारण येत्या सात महिन्यांत मला केमोथेरपीसाठी जावे लागेल. प्रत्येक केमोथेरपीनंतर मला एक आठवडा विश्रांतीची गरज आहे. टक्कल पडलेल्या मॉडेलसोबत शूट करण्याची तुमची तयारी असायला हवी. रोझलिनने सांगितले की, आतापासून ती एका वेळी एक दिवस जगेल. रोझलिनच्या या भावनिक पोस्ट नंतर तिचे चाहते ती कर्करोगावर मात करून लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

कोण आहे रोजलिन खान? - रोजलिन खान शेवटची समीर अंजानच्या 'आभी जा' या गाण्यात दिसली होती. या गाण्यात ती अभिनेता रजनीश दुग्गलसोबत दिसली होती. रोझलिनने पेटा आणि आयपीएलसाठीही काम केले आहे. तसेच रोजलिनने अनेक आयटम नंबरही केले आहेत. कोविडच्या काळात तीने मोठा ब्रेक घेतला होता. याशिवाय रोझलिनचे सोशल मीडियावर बोल्ड फोटोशूटही खूप चर्चेत असतात.

'सविता भाभी' म्हणून प्रसिद्ध - रोजलिनने 'सविता भाभी' चित्रपटात सविता भाभीची भूमिका साकारली होती. याशिवाय तीने 'धामा चौकडी', 'जी लेने दो एक पल में' आणि अशा अनेक टीव्ही शोमध्येही काम केले आहे. कॅन्सरबद्दलही ती लोकांना जागरूक करत असते.

Last Updated : Nov 12, 2022, 7:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.