मुंबई - सुप्रसिद्ध गायक के के याचे अकस्मात निधन झाल्यानंतर संपूर्ण मनोरंजन जगतावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. हा गायक आज आपल्यासोबत नाही. वयाच्या ५३ व्या वर्षी तो या जगातून निघून गेल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. अशातच केकेच्या चाहत्यांसाठी एक खास बातमी आहे. ही बातमी पुन्हा एकदा केकेच्या आठवणी जागृत करणारी आहे.
आज केके याचे अखेरचे गाणे 'धुप पानी बहने दे' रिलीज झाले आहे. हे गाणे त्याने श्रीजीत मुखर्जीचा चित्रपट शेरदिलसाठी रेकॉर्ड करण्यात आले होते. हा चित्रपट २४ जुन रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन सुरू असून ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.या चित्रपटासाठी केके याने गाणे गायले असल्यामुळे चाहते त्याची प्रतीक्षा करीत होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
केकेच्या आवाजातील गाणे 'धुप पानी बहने दे' हे गाणे ऐकताना अंगावर रोमांच उभे राहिल्या शिवाय राहात नाहीत. त्याच्या या गाण्यावर चाहते भरपूर भावनिक कॉमेंट्स करीत आहेत. ''धुप पानी बहने दे'' हे गीत 'शेरदिल - द पिलभीत सागा' या चित्रपटासाठी गुलजार यांनी लिहिले होते. केके याच्या अखेरच्या या गाण्याला शंतनु मोईत्रा यांनी संगीत साज चढवला आहे.
श्रीजीत मुखर्जी दिग्दर्शित 'शेरदिल: द पिलीभीत सागा' चित्रपट गुलशन कुमार, टी-सीरीज फिल्म आणि रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत असून भूषण कुमार आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांनी याची निर्मिती मॅच कट प्रॉडक्शनसह केली आहे. हा कौटुंबिक मनोरंजक चित्रपट 24 जूनपासून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
हेही वाचा - पॅन इंडिया मराठी चित्रपट 'हर हर महादेव'चा टीझर लॉन्च