ETV Bharat / entertainment

लंडनमधील मादाम तुसाद संग्रहालयात रणवीर सिंगनं त्याच्या मेणाच्या पुतळ्यासोबत दिली पोझ - रणवीर सिंगचा मेणाचा पुतळा

Ranveer Singh Wax statues in London : लंडनमधील मादाम तुसाद म्युझियममध्ये रणवीर सिंगचीही उपस्थिती नोंदवण्यात आली आहे. गली बॉयनं त्याच्या मेणाच्या पुतळ्यासोबतचे पोझ देतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Ranveer Singh Wax statues in London
लंडनमधील रणवीर सिंगचा मेणाचा पुतळा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 18, 2023, 7:18 PM IST

मुंबई - Ranveer Singh Wax statues in London : भारतीय चित्रपटसृष्टीतील 'गली बॉय' फेम अभिनेता रणवीर सिंग हा त्याच्या चित्रपटांमुळं आणि वैयक्तिक आयुष्यामुळं खूप चर्चेत असतो. दरम्यान नुकतीच त्याच्या नावावर आणखी एक कामगिरी जमा झाली आहे. लंडनमधील मादाम तुसाद म्युझियममध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्सच्या मेणाच्या पुतळ्यासोबत रणवीर सिंगचे दोन मेणाचे पुतळे बसवण्यात आले आहेत. या बातमीमुळं रणवीर चाहते खूप आनंदी झाले आहेत. गली बॉयनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे. रणवीर सिंग हा मेणाचा पुतळा इतका खरा वाटतो की, तुमचे डोके देखील गोंधळून जाईल.

रणवीर सिंगचा मेणाचा पुतळा : रणवीर सिंगनं त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिलं की, ''मोठे झाल्यावर, जगातील काही प्रसिद्ध आणि प्रमुख व्यक्तींसोबत माझ्या आई-वडिलांचे जुने फोटो पाहून मला भुरळ पडली, फक्त ते लंडनच्या प्रसिद्ध मादाम तुसादमधील मेणाचे पुतळे आहेत हे मला जाणवले. त्या पौराणिक वस्तुसंग्रहालयाचे आकर्षण माझ्यासोबत राहिले, आता तेथे माझी स्वतःची मेणाची आकृती आहे, हे विचार करण्याच्या पलीकडे आहे. माझी व्यक्तिरेखा जगातील सर्वात कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांमध्ये उभी असल्यानं मला धन्य वाटत आहे. एक अविस्मरणीय क्षण, मला या क्षणापर्यंत घेऊन गेलेल्या जादुई सिनेमॅटिक प्रवासावर चिंतन करण्यास भाग पाडणारा आहे''.

स्टार्सनी दिल्या रणवीर सिंगला शुभेच्छा : सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोवर अनेकजण रणवीरवर प्रेमाचा वर्षाव करत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यानं काळ्या रंगाचा थ्री-पीस सूट घातलेला दिसत आहे. तो मध्यभागी उभा राहून मेणाच्या पुतळ्यांसोबत पोझ देत आहे. एक पुतळा पारंपारिक रंगीबेरंगी शेरवानीमध्ये आहे तर , दुसरा पुतळा हा पाश्चात्य पोशाखात आहे. या फोटोवर एका चाहत्यानं लिहिल, ''तुझा खूप अभिमान आहे, तुझ स्वप्न पूर्ण झालं आहे''. दुसऱ्या एकानं लिहिलं, ''तुझ खूप खूप अभिनंदन''आणखी एका चाहत्यानं लिहिल, ''तुझे दोन्ही पुतळे खूप सुंदर आहेत''. अशा अनेक कमेंट्स या फोटोवर येत आहेत. याशिवाय काहीजण या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. चित्रपटसृष्टीतील सर्व स्टार्सनी प्रतिक्रिया व्यक्त करत रणवीरचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान, रणवीरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'डॉन-3' आणि 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. जेठालाल उर्फ दिलीप जोशी यांच्या मुलाच्या लग्नात 'तारक मेहता'च्या कलाकारांनी लावली हजेरी
  2. प्रभासच्या भव्य अ‍ॅक्शनचा सनसनाटी थरार असलेला 'सालार'चा ट्रेलर लॉन्च
  3. विकी कौशल स्टारर 'सॅम बहादूर'नं 100 कोटींचा टप्पा केला पार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.