मुंबई - अभिनेत्री आदिती राव हैदरी आणि रंग दे बसंती फेम अभिनेता सिद्धार्थ यांचा डान्स करत असतानाचा एक सुंदर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दोन वर्षापूर्वी त्यांनी अजय भूपती दिग्दर्शित महा समुद्रम या तेलुगु चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटात महालक्ष्मी ही व्यक्तीरेखा साकारणारी अदिती राव हैदरी काही काळापासून सिद्धार्थशी टेड करत असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अदितीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओतील त्यांची केमेस्ट्री पाहून त्यांच्यात किती सहजता आहे हे लक्षात येईल.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांनी तमिळ चित्रपट एनिमी यातील टम टम या गाण्यावर हे रील बनवले आहे. गाण्याच्या प्रत्येक बीटवर अतिशय सुरेख असा ताल धरत दोघेही सुंदर डान्स करताना दिसतात. अदितीने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये डान्स मंकीज - द रील डील असे कॅप्शन दिले आहे. या गाण्यात दोघांची उत्तम केमेस्ट्री दिसून येत आहे. या रीलमुळे दोघांच्या डेटिंगची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.
अदिती राव हैदरी कोण आहे - अदिती राव हैदरी ही हिंदी, तमिळ आणि तेलुगु चित्रपट उद्योगात काम करते. तिने 2006 मध्ये मल्याळम चित्रपट प्रजापती द्वारे तिच्या चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिने संगीतमय रोमँटिक ड्रामा, रॉकस्टार (2011), हॉरर-थ्रिलर मर्डर 3 (2013), यासह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये प्रमुख ते किरकोळ सहायक भूमिका केल्या. थ्रिलर वझीर (2016), आणि ऐतिहासिक काळातील चित्रपट पद्मावत (2018) या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या होत्या. तिने मणिरत्नमच्या कात्रु वेलीयिदाई (२०१७) आणि सुफियुम सुजातायुम (२०२०) यासह अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.
सिद्धार्थ विषयी थोडेसे - सिद्धार्थ या नावाने ओळखला जाणाऱ्या या अभिनेत्याचा नाव सिद्धार्थ सूर्यनारायण असे आहे. त्याने आजवर तमिळ, तेलगू आणि हिंदी भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयासोबतच त्याने पटकथा लेखक, निर्माता आणि पार्श्वगायक म्हणूनही चित्रपटांमध्ये सहभाग घेतला आहे. बिझनेस मॅनेजमेंटचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर, सिद्धार्थने चित्रपट निर्मितीमध्ये करियर करणे निवडले. एस. शंकर यांच्या तमिळ चित्रपट बॉईज (2003) मध्ये अभिनय पदार्पण करण्यापूर्वी त्याने प्रसिध्द तमिळ दिग्दर्शक मणिरत्नमला सहाय्य केले. या चित्रपटाच्या यशाने मणिरत्नमच्या मल्टीस्टारर अयुथा एझुथु (2004) मध्ये दाखविण्याची संधी दिली, नुवोस्तानते नेनोदंतना (2005), रंग दे बसंती आणि बोम्मारिल्लू (2005), तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये समीक्षक आणि व्यावसायिक यांची भरपूर प्रशंसा मिळाली.