मुंबई Randeep and Lin Wedding Reception : अभिनेता रणदीप हुड्डा आणि अभिनेत्री लिन लैशराम यांचा विवाह इम्फाळमध्ये मेईतेई पद्धतीनं पार पडला. यांच्या लग्नात काही जवळचे मैत्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. रणदीप आणि लिननं बॉलिवूडच्या लग्नांपेक्षा पूर्णपणे वेगळं लग्न केलं. या लग्नाची आता सर्वत्र चर्चा होत आहे. या जोडप्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ अनेक चाहत्यांना आवडले आहेत. त्यांच्या लग्नाचा एक न पाहिलेला व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये लग्नातील मणिपुरी रितीरिवाजांची झलक दाखवण्यात आली आहे.
लिन लैशराम आणि रणदीप हुड्डा रिसेप्शन : लिन लैशरामनं तिच्या इन्स्टा स्टोरीवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये रणदीप आणि लिनच्या लग्नाची सुंदर झलक दाखवण्यात आली आहे. याशिवाय व्हिडिओत लग्नापूर्वीच्या क्षणापासून तर वधू-वर प्रवेश, वरमाला आणि लग्नानंतरच्या समारंभापर्यंतची झलक दाखविण्यात आली आहे. मणिपुरी रितीरिवाजानुसार लग्न केल्यामुळं रणदीप आणि लिनचं लग्न हे हटके असल्याचं दिसत आहे. हे नवविवाहित जोडपं मुंबईत वेडिंग रिसेप्शन आयोजित करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या जोडप्याच्या लग्नाचं रिसेप्शन 11 डिसेंबरला होणार आहे. या रिसेप्शनमध्ये लिनच्या कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त, काही हिंदी चित्रपटसृष्टीतील सेलेब्रिटी उपस्थित राहतील. त्यांच्या लग्नाप्रमाणेच, त्यांच्या रिसेप्शनमध्येही हे जोडपं पारंपारिक पद्धतीचं पालन करताना दिसेल.
रणदीप हुड्डा आणि लिन लैशरामचं लूक : लग्नात रणदीप हुड्डानं पांढरा कुर्ता-पायजमा सोबत सोनेरी आणि पांढरी पगडी घातली होती. मणिपुरी वराच्या लूकमध्ये तो खूप छान दिसत होता. दुसरीकडे, वधू लिन देखील मणिपुरी ब्राइडल लूकमध्ये सुंदर दिसत होती. तिनं पोटलोई ड्रेस परिधान केला होता. यावर तिनं न्यूड मेकअपसह सुंदर दागिने घातले होते.
हेही वाचा :