ETV Bharat / entertainment

रणदीप हुड्डा आणि लिन लैशरामच्या वेडिंग रिसेप्शनचे फोटो झाले व्हायरल - रणदीप आणि लिनचं लूक

Randeep hooda : अभिनेता रणदीप हुड्डा आणि अभिनेत्री लिन लैशराम यांनी 11 डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

Randeep hooda
रणदीप हुड्डा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 12, 2023, 10:42 AM IST

मुंबई - Randeep hooda : हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेलं जोडपं म्हणजे रणदीप हुड्डा आणि लिन लैशराम यांचा 29 नोव्हेंबर रोजी विवाह पार पडला. मणिपूर येथील इम्फाळमध्ये मेईतेई पद्धतीनं त्यांनी विवाह केला. दरम्यान 11 डिसेंबर रोजी या जोडप्यानं मुंबईत रिसेप्शनचे आयोजन केले होते. आता रणदीप आणि लिन यांनी रिसेप्शनमधील त्यांचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या जोडप्याचे फोटो खूप जबरदस्त आहेत. रणदीप आणि लिन त्यांच्या रिसेप्शन खूप सुंदर दिसत आहे. या जोडप्यानं शेअर केलेल्या फोटोवर अनेकजण कमेंट करून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

रणदीप आणि लिनचं लूक : रिसेप्शनमध्ये, रणदीप काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. याशिवाय लिननं लाल रंगाची चमकदार साडी नेसली होती. यावर तिनं हलका मेकअप केला होता. याशिवाय तिनं केस बनमध्ये बांधले होते. या लूकला आणखी खास बनविण्यासाठी तिनं नेकलेस आणि यावर सुंदर मॅचिंग इयररिंग्स घातले होते. या जोडप्याचे दोन्ही पोशाख डिझायनर रोहित गांधी आणि राहुल खन्ना यांनी डिजाइन केले आहे. रिसेप्शनमधील फोटो शेअर करताना रणदीपनं कॅप्शनमध्ये लिहिल, 'आमच्या मनाच्या ईडन गार्डनमध्ये'. आता या पोस्टवर अनेकजण कमेंट करून त्यांना शुभेच्छा देत आहेत.

रिसेप्शनमध्ये या कलाकारांनी लावली होती हजेरी : रणदीप-लिनच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये बॉलिवूडचे ट्रेंडिंग कपल अभिनेता विजय वर्मा आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया हातात हात घालून पोहोचले. अभिनेता जितेंद्र आणि जॅकी श्रॉफही त्याच्यासोबत सामील झाले. याशिवाय या रिसेप्शनमध्ये अभिनेता चंकी पांडे, जावेद जाफरी, गजराज राव, रसिका दुग्गल, फिल्म मेकर इम्तियाज अली यांसारखे स्टार्स उपस्थित होते. दरम्यान रणदीप आणि लिन त्याच्या लग्नातील फोटो खूप चर्चेत आहेत. हे जोडपे त्यांच्या लग्नात मणिपुरी पारंपारिक पोशाखात सुंदर दिसत होते. फोटो शेअर करताना जोडप्यानं लिहिलं, ''आजपासून आम्ही एक आहोत''. या कपलच्या लग्नातील फोटो देखील अनेकांना आवडले आहेत.

हेही वाचा :

  1. गुगल इयर इन सर्च 2023च्या टॉप चित्रपटांमध्ये 'जवान', टॉप कलाकारांमध्ये कियारा अडवाणी सामील
  2. लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केल्यानंतर कॅटरिना कैफ मुंबई विमातळावर झाली स्पॉट
  3. विना मेकअप काम करण्याचा विश्वास वाढला, शिवानी सुर्वेनं सांगितला झिम्मा 2 चा अनुभव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.