मुंबई : रांचीचे न्यायदंडाधिकारी डीएन शुक्ला यांच्या न्यायालयाने बॉलिलूड अभिनेत्री अमिषा पटेलला ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. अमिषाच्या विरोधात चेक बाऊन्स आणि फसवणूक प्रकरणी सुनावणी दरम्यान उलट तपासणीसाठी बुधवारची तारीख निश्चित करण्यात आली होती. खटला दाखल करणार्या अजय सिंग यांच्या वतीने न्यायालयात साक्षीदार हजर करण्यात आले होते. न्यायालयाने अमिषा पटेलच्या वकिलाला साक्षीदाराची उलटतपासणी करण्यास सांगितले, त्यानंतर अमिषाच्या वकीलाने यासाठी वेळ मागितला. यानंतर न्यायालयाने दंड ठोठावताना पुढील सुनावणीची तारीख ७ ऑगस्ट निश्चित केली.
अमिषा पटेलला ५०० रुपयांचा दंड ठोठावला : रांची न्यायालयात सुरू असलेल्या या प्रकरणात, अमिषा पटेलने १७ जून रोजी रांची न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश डीएन शुक्ला यांच्या न्यायालयात आत्मसमर्पण केले होते. आत्मसमर्पण केल्यानंतर न्यायालयाने त्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या दोन जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. अर्गोरा येथील रहिवासी अजय कुमार सिंगने १७ नोव्हेंबर २०१८ रोजी सीजेएम कोर्टात अमिषाच्या विरोधात केस दाखल केली होती. संगीत निर्मितीच्या नावाखाली अमिषा पटेलने अजय कुमार सिंग यांच्याकडून अडीच कोटी रुपये घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र अशी कुठलीच संगीत निर्माती झाली नाही. त्यानंतर अमिषाने चित्रपट निर्मितीसाठी २.५ कोटी घेतले होते. मात्र २०१८मध्ये चित्रपट देखील प्रदर्शित झाला नाही.
अमिषा पटेलने केली फसवणूक : दोन्ही पक्षांमधील करारानुसार, २०१८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. त्यानंतर अजय सिंगला जाणवले की त्यांची फसवणूक होत आहे. त्यानंतर त्यांनी अमिषाला पैसे परत मागितले. नंतर, खूप दिरंगाई केल्यानंतर, अमीषाने २.५ कोटी आणि ५० लाख रुपयांचा चेक दिला हा चेक बाऊन्स झाला. यानंतर अजय सिंगने अमिषा पटेलवर खटला दाखल केला. तसेच अजय सिंगच्या वतीने असाही आरोप करण्यात आला आहे की, अमिषा पटेल आणि तिच्या जोडीदाराने त्यांना पैशाची मागणी करण्यासाठी फोनवर धमकी दिली होती. त्यामुळे या प्रकरणावर सध्या सुनावणी सुरू आहे. अधिवक्ता विजय लक्ष्मी श्रीवास्तव यांनी सांगितले की, या प्रकरणी दीर्घकाळ चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने अलीकडेच अभिनेत्री अमिषा पटेलविरुद्ध वॉरंट जारी केले होते. त्यानंतर अमिषा पटेल यांनी न्यायालयात हजर राहून जामीन घेतला. दरम्यान न्यायालयाने त्यांना मध्यस्थीचा पर्यायही दिला मात्र त्यांनी आरोप निश्चित करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच आधारावर २६ जुलै रोजी या प्रकरणी साक्ष होणार होती.
हेही वाचा :