ETV Bharat / entertainment

गंगूबाईसाठी पुरस्कार मिळाल्यानंतर आलिया भट्टचा पहाटे २ वाजता रणबीरने क्लिक केला फोटो - गंगुबाई काठियावाडी

आलियाने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात गंगूबाई काठियावाडीतील आलिया भट्टच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मिळालेला पुरस्कार तिच्या हातात धरला आहे. तिचा पती रणबीर कपूरने टिपलेला हा फोटो खूपच खास आहे.

पहाटे २ वाजता रणबीरने क्लिक केला फोटो
पहाटे २ वाजता रणबीरने क्लिक केला फोटो
author img

By

Published : Feb 27, 2023, 4:10 PM IST

मुंबई - झी सिनेमा अवॉर्ड्सच्या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री आलिया भट्टला गंगूबाई काठियावाडीतील भूमिकेसाठी 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' पुरस्कार जिंकल्यानंतर तिचा पती रणबीर कपूरची मान गर्वाने उंचावली आहे. पत्नीच्या पाती असलेल्या पुरस्कार पाहून रणबीर आलियाचा फोटोग्राफर बनला होता. त्याने क्लिक केलेला फोटो व्हायरल झाला आहे. आलिया भट्टने पुरस्कार सोहळ्यातील फोटोंची मालिका इंस्टाग्रामवर पोस्ट केली, परंतु लक्ष वेधून घेतले ते म्हणजे तिच्या पुरस्कारासोबत पोझ करतानाचा एक विशेष फोटो, जो वरवर पाहता तिचा पती रणबीर कपूरने पहाटे 2 वाजता क्लिक केला होता.

फोटो शेअर करताना अभिनेत्री आलियाने लिहिले, गंगूवरील प्रेम. सन्मानासाठी झी सिने अवॉर्ड्सचे आभार! सर, भन्साळी प्रॉडक्शनची मी किती आभारी आहे हे सांगण्यासाठी माझ्याकडे कोणतेही शब्द पुरेसे नाहीत. संयमाने पहाटे २ वाजता माझा फोटो काढल्याबद्दल माझ्या पतीचा विशेष उल्लेख.' संधी दिल्याबद्दल गंगूबाई काठियावाडीचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे आभार मानत आलियाने पती रणबीर कपूरला 'धीराने' मध्यरात्री तिचे फोटो क्लिक केल्याबद्दल खास आभार मानले आहेत.

तिच्या इंस्टाग्राम हँडलच्या स्टोरी सेक्शनमध्ये शेअर केलेल्या फोटोमध्ये आलियाचा सर्वोत्तम नैसर्गिक स्वभाव दिसत होता. पुरस्कारावर लक्ष केंद्रित केले असले तरी आलिया या पुरस्कारातून डोकावताना दिसली. मोकळे केस सोडलेली, राखाडी पायजमा आणि पांढरा सैल टी-शर्ट घातलेल्या अभिनेत्री आलियाने तिच्या बेडरूममध्ये हा पुरस्कार हातात धरला होता. आलियाला तिच्या घरातील सर्वोत्तम क्षण टिपून देण्याचे श्रेय नक्कीच रणबीर कपूरला जाते.

इव्हेंटसाठी, आलियाने ग्लॅमरस लुक निवडला आणि झी सिनेमा अवॉर्ड्स 2023 मध्ये रेड कार्पेटचा ताबा मिळवला. तिने तिच्या हाय -स्लिट चमकदार हिरव्या गाऊनने उपस्थितांना चक्रवून सोडले. कमी कमी मेकअप आणि कुरळ्या केसांची बट मोकळी सोडत आलियाने आपला सुंदर लूक जपला होता. रणबीर आणि आलिया सध्या मुलगी राहा भट्ट कपूरचे पालकत्व स्वीकारले असून त्यांची मुलगी आता तीन महिन्यांची झाली आहे. मुलीच्या आगमनाने भट्ट आणि कपूर कुटुंबात आनंदाची लहर निर्माण झाली आहे.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शत गंगुबाई काठियावाडी या चित्रपटात आलिया भट्टने मुख्य भूमिका केली होती. मुंबईतील कामाळीपुऱ्यातील वेश्यवस्तीतील महिलांच्या शोषणाच्या विरोधात लढणाऱ्या कणखर भूमिकेमुळे आलियाचे खूप कौतुक झाले होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही चांगले यश मिळाले होते आणि प्रेक्षकांसह समिक्षकांनीही कौतुकाचा वर्षाव आलियावर केला होता.

हेही वाचा - Kangana Ranauts New Claim : हिरोंच्या खोलीत जात नसल्यामुळे फिल्म माफिया माझ्यावर नाराज, कंगना रणौतचा नवा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.