मुंबई - बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने पत्नी आलिया भटबद्दल बोलत असलेला व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल आणि हिट झाल्यानंतर ट्रोलर्सना आमंत्रित केले आहे. रणबीर आलियाशी ज्या प्रकारे वागत आहे त्याबद्दल सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आलियाने दावा केला आहे की रणबीर तिला तिची लिपस्टिक काढण्यास सांगतो कारण त्याला ओठांचा नैसर्गिक रंग अधिक पसंत असतो.
या प्रकारामुळे सोशल मीडियामध्ये रणबीरवर कठोर टीका झाली आहे आणि नेटिझन्सने त्याची तुलना शाहिद कपूरच्या कुप्रसिद्ध पात्र कबीर सिंगशी केली आहे. रणबीर कपूरचे हे वागणे अनेकांना आवडलेले नाही आणि त्यामुळे ते टीका करत आहेत. एका युजरने म्हटलंय की, बॉलिवूडची तिच्या काळातील श्रेष्ठ आणि आघाडीची अभिनेत्री आपली महागडी लिपस्टिक तिच्या नवऱ्याच्या सांगण्यावरुन पुसून टाकते. मग तिच्या आवडीचे काय? असा प्रश्न तयार होत नाही का ?.'
आणखी एकाने म्हटलंय की, 'नवऱ्याच्या चुकीच्या बोलण्याचेही ते समर्थन करत आहे, असे तिला वाटत नाही का? तिला जर ते योग्य आहे असे वाटत असेल तर यातून चुकीचा संदेश जातो. '
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे सध्याचे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहणारे जोडपे आहे. ब्रम्हास्त्रच्या सेटवर सुरू झालेला त्यांचा रोमान्स बोहल्यापर्यंत पोहोचला होता. १४ एप्रिल २०२२ रोजी दोघांनी एकमेकांना पुष्पाहार घालून स्वीकारले. या प्रसंगी दोन्ही कुटुंबातील नातेवाईक हजर होते. त्यांच्या सुखी संसारात आता एका मुलीचा समावेश झाला आहे.
आलिया आणि रणबीर यांचे फिल्म इंडस्ट्रीमध्येही काही लोक कट्टर विरोधक आहेत. त्यामध्ये कंगना रणौतचे नाव आघाडीवर असते. मध्यंतरी नीतू कपूर लंडनमध्ये असताना तिच्या वाढदिवशी भेटीसाठी रणबीर गेला होता. आलिया मात्र मुंबईतच मुलीसोबत राहिली होती. त्यावेळी कंगना म्हणाली होती की, 'त्यांचे लग्न नकली आहे. केवळ एक तडजोड म्हणून ते एका घरात पण वेगवेगळ्या बेडरुममध्ये राहतात. पण विरोधकांच्या अशा टींगल टवाळीचा त्यांच्यावर काहीही परिणाम झालेला नाही.'
हेही वाचा -
१. Shilpa Shetty : ध्वज फडकावण्याच्या व्हिडिओवर ट्रोल करणाऱ्यांना दिले शिल्पा शेट्टीने प्रत्युत्तर...
२. Bharat Jadhav New Play : तीन दशके हसवल्यानंतर भरत जाधव प्रेक्षकांन हळवं करणार, नव्या नाटकासाठी सज्ज
३. Kaam Chalu Hai wrap up : 'काम चालू है'चे शुटिंग संपले, सांगलीने जिंकले पलाश मुछलचे 'दिल'!