मुंबई - Animal Advance Booking : 'कबीर सिंग' आणि 'अर्जुन रेड्डी' सारखे चित्रपट बनवलेले दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा सध्या आगामी 'अॅनिमल' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. यामध्ये रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना आणि बॉबी देओल यासारखे स्टार्स लीड रोलमध्ये दिसणार आहेत. 23 नोव्हेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. हा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडला आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या 8 दिवस आधीपासून आगाऊ बुकिंगही सुरू करण्यात आले आहे. या चित्रपटाचे शो सध्या हाऊसफुल्ल होत आहेत. चित्रपटाची तिकिटे हजारांत विकली जात आहेत.
'अॅनिमल' चित्रपटाची आगाऊ बुकिंग सुरू : 'अॅनिमल'साठी आगाऊ बुकिंग सुरू होताच अनेकजण तिकिट बुक करत आहेत. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. मुंबईत याबाबत लोकांमध्ये प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. तिकीट काढण्यासाठी लोक हजारो खर्च करायला तयार आहेत. याशिवाय 'अॅनिमल' चित्रपटाची तिकिटेही खूप महागात विकली जात आहेत. मुंबईतील चित्रपटाचा सर्वात महागडा शो जवळपास हाऊसफुल्ल झाला आहे. मुंबईतील 'अॅनिमल'चे सर्वात महागडे तिकीट 2200 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
'अॅनिमल' चित्रपटाचे तिकिट : रात्री 11:30च्या शोसाठी बुकिंग वेबसाईटवर तिकिटे बुक केली जात आहेत. 1500 ते 2000 रुपयांच्या दरम्यान असलेल्या या चित्रपटाचे शोही जवळपास विकले गेले आहेत. या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये खूप उत्साह पाहायला मिळत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच, अवघ्या एका दिवसात 1 लाख 11 हजार 317 तिकिटे बुक झाली आहेत. यानंतर या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 3.4 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आगाऊ बुकिंगद्वारे या चित्रपटानं हिंदीमध्ये 3 कोटींहून अधिक, तेलुगूमध्ये 33 लाख 80 हजार रुपयांहून अधिक आणि तमिळमध्ये 13,510 रुपये कमावले आहेत.
- 'अॅनिमल'ची टक्कर होईल सॅम बहादूर'शी : रणबीर कपूरचा 'अॅनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची टक्कर बॉक्स ऑफिसवर विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'शी होईल. या दोन्ही चित्रपटांसाठी चाहते खूप उत्सुक आहेत. 'सॅम बहादूर'चं अॅडव्हान्स बुकिंगही सुरू झाली आहे. दरम्यान आता बॉक्स ऑफिसवर कोणाचा दबदबा कायम राहतो हे पाहणे रंजक ठरेल.
हेही वाचा :