ETV Bharat / entertainment

'अ‍ॅनिमल'मधील भूमिकेचं अर्जुन रेड्डी आणि कबीर सिंगशी साम्य असल्याचं रणबीर कपूरनं केलं कबुल - अ‍ॅनिमल रणबीर कपूरची भूमिका

Ranbir Kapoor reveals role in Animal संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शन 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी रणबीर कपूर सज्ज आहे. यात त्यानं ग्रे स्वरुपाची उग्र व्यक्तीरखा साकारली आहे. यातील त्याच्या भूमिकेमध्ये वंगा यांच्या आधीच्या अर्जुन रेड्डी आणि कबीर सिंग चित्रपटातील पात्रांची झलक दिसते.

Animal Starring Ranbir Kapoor
अ‍ॅनिमल रणबीर कपूरची भूमिका
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 22, 2023, 11:46 AM IST

मुंबई - संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या रिलीजच्या तयारीत अभिनेता रणबीर कपूर आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अद्याप रिलीज व्हायचाय. यापूर्वी रिलीज झालेल्या चित्रपटाच्या टीझर आणि गाण्यामधून यातील त्यच्या भूमिकेत संदीप रेड्डी वंगा यांच्या गाजलेल्या 'अर्जुन रेड्डी' आणि 'कबीर सिंग'ची झलक पाहायला मिळतेय. 'अर्जुन रेड्डी' हा मूळ चित्रपट तेलुगू भाषेत बनला होता आणि नंतर 'कबीर सिंग' या नावानं त्याचा हिंदीत रिमेक करण्यात आला होता.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

त्याच्या भूमिकेबदद्ल बोलताना रणबीर कपूर म्हटलंय की, संदीप रेड्डी याच्या पूर्वीच्या नायकांमधील समानता आणि फरक दोन्ही यातील व्यक्तीरेखांमध्ये आहेत. केवळ वंगा याच्या पूर्वीच्या कामाचा प्रभाव न ठेवता स्क्रिप्टचं आकर्षण म्हणून भूमिका स्वीकारली असल्याचं रणबीर म्हणाला.

अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना आणि बॉबी देओल यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'अ‍ॅनिमल' हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. एका आंतरराष्ट्रीय मासिकाला दिलेल्या मुलाखतीत, रणबीरनं वंगाच्या मागील चित्रपटांमधील खलवृत्तीच्या चित्रणाबद्दल चिंता व्यक्त केली आणि वंगा यांच्या प्रभावाबद्दल कौतुकही व्यक्त केलं. परंतु 'अ‍ॅनिमल'मध्ये सामील होण्याचा त्याचा निर्णय चित्रपटाची स्क्रिप्ट आणि संदीप वंगासोबत काम करण्याची संधी घेतली असल्याचं तो म्हणाला.

रणबीरला विश्वास आहे की 'अ‍ॅनिमल' सिनेमाचा एक वेगळा अनुभव देईल. वंगाच्या आधीच्या नायकांशी त्याच्या पात्राचे साम्य असल्याचे मान्य करून, त्यानं त्याच्या भूमिकेत दडलेले गुंतागुंतीचे स्तर आणि खोली लक्षात घेतली, असुरक्षितता आणि अंतर्गत संघर्षाचे क्षण त्यात जोडले, ज्यामुळे पात्र अधिक अस्सल आणि मानवी झाले.

'अ‍ॅनिमल' हा चित्रपट सुरुवातीला 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार होता. परंतु त्या दरम्यान रिलीज होणाऱ्या इतर चित्रपटांशी होणारी बॉक्स ऑफिसवरील टक्कर टाळण्यासाठी चित्रपटाची रिलीज तारीख 1 डिसेंबर करण्यात आली. हा चित्रपट हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम यासह अनेक भाषांमध्ये उपलब्ध असेल. विकी कौशल स्टारर 'सॅम बहादूर' या सिनेमासोबत 'अ‍ॅनिमल'ची बॉक्स ऑफिसवर रिलीज टक्कर होणार आहे.

हेही वाचा -

  1. बिग बॉस 17'मध्ये अंकिता लोखंडेनं पती विकी जैनला मारली चप्पल

2. नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत थ्रिलर वेब सिरीजमध्ये झळकणार प्रिया बापट

3. अभिनेता समीर कोचरची बिल्डरकडून फसवणूक, गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.