मुंबई : बॉलीवूडचे स्टार कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना लग्नाच्या शुभेच्छा म्हणून अनेक भेटवस्तू मिळत आहेत. पण सगळ्यांच्या नजरा एका भेटीवर खिळल्या होत्या. प्राणी कल्याण एनजीओने आलिया-रणबीरला एक घोडा आणि घोडीची जोडी भेट म्हणून दिली आहे. या अनोख्या भेटीचे स्वागत आलिया आणि रणबीरने केले आहे. या दोन्ही घोड्यांची वेगवेगळ्या ठिकाणाहून सुटका केल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून या स्टॅलियनची सुटका करण्यात आली. त्यावेळी व्हिक्टोरियाच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी याचा वापर केला जात होता. स्टॅलियनची अवस्था अतिशय दयनीय होती. त्याला ऑस्टियोआर्थराइटिसचा त्रास होता. त्याच्या चारही पायांना वेदनादायक सूज आली होती.
तर घोडी अशक्त होती. तिला अनेक संक्रमित जखमा होत्या आणि ती गंभीर कुपोषित होती. बचावकार्यानंतर दोन्ही घोड्यांना अॅनिमल रिलीफमध्ये ठेवण्यात आले. पौष्टिक आहाराबरोबरच पशुवैद्यकीय औषधही देण्यात आले. अॅनिमल रिलीफ ही संस्था घोड्यांना मोफत मदत पुरवते.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी 14 एप्रिल रोजी एकमेकांचा हात धरून आयुष्यभरासाठी सात फेरे घेतले. रणबीर आणि आलियाच्या लग्नाला संपूर्ण कपूर आणि भट्ट कुटुंबाने हजेरी लावली होती.
संपूर्ण सोशल मीडिया रणबीर आणि आलियाच्या फोटोंनी सजला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी आणि स्टार कपलचे चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत.
हेही वाचा - रणबीर आलियाच्या लग्नानंतर हे ५ बॉलिवूड कपल्सना बोहल्यावर चढण्याची प्रतीक्षा