मुंबई - बुधवारी आलिया भट्टची मेहंदी आटोपल्यानंतर सर्वांचे लक्ष आज गुरुवारी होणाऱ्या लग्नसोहळ्याकडे लागले आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचे कुटुंबीय गुरुवार, १४ एप्रिल रोजी होणाऱ्या पॉवर कपलच्या लग्नसोहळ्यासाठी तयारी करत आहेत.
आज सकाळी वधू-वरांसाठी हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. लग्नाचे सेलिब्रेशन जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. काल मेहंदी सोहळ्यानंतर नीतू कपूरने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिच्या मेहेंदीचा एक फोटो शेअर केला आहे.नीतू कपूरने इन्स्टाग्रामवर मेहेंदीचा एक जुना फोटो शेअर केला आहे. ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांची एंगेजमेंट १३ एप्रिल १९७९ रोजी झाली होती. विशेष म्हणजे तो दिवसही बैशाखीचा होता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
नीतू कपूरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या ताज्या फोटोमध्ये तिच्या हातावर मेहंदी लागल्याचे दिसत आहे. यातील अंगठ्यालगतच्या तर्जनी बोटावर RISHI असे लिहिले आहे.
रणबीर कपूरची वरात मुंबईतील चेंबूर येथील कृष्णा राज बंगला (आरके हाऊस) ते टोनी पाली हिल परिसरात असलेल्या आलियाच्या 'वास्तू'पर्यंत जाईल. रणबीरने मिरवणूक काढण्यासाठी पूर्वपरवानगी घेतली नसल्यामुळे त्यांच्या लग्नाच्या मार्गात अनपेक्षित अडचण येऊ शकते, असेही बोलले जात आहे.
संपूर्ण कपूर कुटुंब आलिया भट्टच्या पाली हिल येथील घरी येणार आहे. हे दोन्ही बंगले एक किलोमीटरहून कमी अंतरावर आहेत. येथे लग्नाचे सर्व विधी पूर्ण होतील. कपूर कुटुंबासाठी आजचा दिवस मोठा आहे, ज्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
कृष्णा राज बंगला (आरके हाऊस) ते टोनी पाली हिल परिसरातील आलियाचे घर या वरात मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आज दुपारी 2 वाजता 7 फेरे किंवा पवित्र फेरे घेतील.
बॉलीवूड स्टार रणबीर आणि आलिया त्यांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. 2018 मध्ये सोनम कपूरच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये दोघांनी पहिल्यांदा जोडप्याच्या रुपात हजेरी लावली होती.
हेही वाचा - लग्नानंतर आलिया भट्टच्या सांगण्यावरुन सर्वप्रथम रणबीर करणार हे काम