मुंबई - पौराणिक आणि विज्ञानकथेचा मिलाफ असलेला ब्रम्हास्त्र चित्रपटाचा भव्य ट्रेलर लॉन्च झाला आहे. बऱ्याच वर्षापासून या चित्रपटाची प्रतीक्षा बॉलिवूडला होती. अतिभव्य व डोळ्यांची पारणे फेडणारी दृष्ये या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
नवविवाहित जोडपे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची एकत्रित भूमिका असलेला पहिलाच चित्रपट ब्रम्हास्त्रचा ट्रेलर बुधवारी लॉन्च झाला आहे. ट्रेलर लॉन्च होण्याच्या काही तास आधी, दोघांनी चाहत्यांसाठी एक खास व्हिडिओ संदेश शेअर केला ज्यामध्ये त्यांनी चित्रपट बनवण्यासाठी किती मेहनत घेतली आहे हे सांगितले आहे.
रणबीर सोशल मीडियावर नसल्याने त्याचा व्हिडिओ संदेश त्याची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर यांनी तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर अपलोड केला होता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
व्हिडिओ क्लिपमध्ये रणबीर म्हणाला, "मित्रांनो, माझ्यासाठी खास आणि अद्भुत दिवस आहे. ब्रह्मास्त्र भाग १: शिवाचा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार आहे. मला माहीत आहे की तुम्ही सर्वजण या चित्रपटाची खूप दिवसांपासून वाट पाहत आहात. मी तुमच्या प्रतिसादांची वाट पाहत आहे. खरं तर अंदर से मर रहा हूँ. ब्रह्मास्त्र सारख्या चित्रपटाचा भाग बनण्याची संधी मला पुन्हा मिळेल की नाही हे देखील मला माहित नाही. हा चित्रपट बनवण्यासाठी आम्ही आमचे रक्त, घाम, वेळ, हृदय, आत्मा, यकृत, किडनी, सर्वकाही दिले आहे आणि मला खरोखर आशा आहे की ते तुम्हाला उत्साही, आनंदित आणि गुंतवून ठेवेल,” तो पुढे म्हणाला.
व्हिडिओ टाकताना नीतू कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले की, "शिवा आणि ईशा tmrw".
-
A special message from Isha ❤️
— BRAHMĀSTRA (@BrahmastraFilm) June 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The trailer of Brahmāstra arrives tomorrow. Are you ready? 🔥#Brahmastra#AliaBhatt pic.twitter.com/QfzTGeG5Xw
">A special message from Isha ❤️
— BRAHMĀSTRA (@BrahmastraFilm) June 14, 2022
The trailer of Brahmāstra arrives tomorrow. Are you ready? 🔥#Brahmastra#AliaBhatt pic.twitter.com/QfzTGeG5XwA special message from Isha ❤️
— BRAHMĀSTRA (@BrahmastraFilm) June 14, 2022
The trailer of Brahmāstra arrives tomorrow. Are you ready? 🔥#Brahmastra#AliaBhatt pic.twitter.com/QfzTGeG5Xw
आलियाने पती रणबीरची क्लिप शेअर करण्याव्यतिरिक्त तिच्या चाहत्यांसाठी एक व्हिडिओ संदेशही शेअर केला आहे. तिच्या व्हिडिओ संदेशात, आलियाने शेअर केले की तिने "25-30" वेळा ट्रेलर पाहिला आहे.
पौराणिक कथा आणि विज्ञानकथेचा मिलाफ असलेला 'ब्रह्मास्त्र' 9 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही भूमिका आहेत.
हेही वाचा - 'ब्रह्मास्त्र'मधील 'अंधेरे की रानी' मौनी रॉय, डंख मारण्यासाठी 'नागिन' सज्ज