मुंबई - 95 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात आरआरआर चित्रपटाची टीम अत्यंत अभिमानाने सहभागी होणार आहे. या चित्रपटातील नाटू नाटू हे गाणे मूळ गाण्याच्या कॅटेगरीमध्ये नॉमिनेट झाले आहे. एसएस राजमौली यांच्या या टीममध्ये बाहुबली स्टाक राणा दग्गुबत्ती सामील होण्याची तयारी करत असून ऑस्कर पुरस्कारामध्ये या चित्रपटाच्या टीमला आणि गीतकार, संगीतकार, गायक आणि कलाकारांसह दिग्दर्शकाला प्रोत्सहन देण्यासाठी राणा दग्गुबती लॉस एंजेलिसला रवाना होणार आहे.
बाहुबली: द बिगिनिंग आणि बाहुबली 2: द कन्क्लूजन मध्ये एसएस राजामौली सोबत काम करणारा अभिनेता राणा दग्गुबत्ती आरआरआर चित्रपटाचा चीअर लीडर बनून जात आहे. राणाने सांगितले की तो राजामौली, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांना ऑस्करमध्ये सामील होताना पाहण्यास इच्छुक आहे आणि याचा त्याला वैयक्तिकरित्या आनंद झाला आहे.
राणा दग्गुबती याची राणा नायडू ही मालिका येत्या १० मार्चला नेटफ्लिक्सवर प्रवाहित होणार आहे. एक अॅक्शन पॅक्ड ड्रामा असलेली ही वेब सिरीज राणासाठी खूप महत्त्वाची आहे. सध्या तो याच्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे. या बेव सिरीजचे प्रदर्शन सुरळीत पार पडले की तो अमेरिकेला जाऊन आरआरआर टीममध्ये सामील होऊ शकतो.त्याला खात्री आहे की आरआरआर टीम यावेळी ऑस्करची ट्रऑफी जिंकेल आणि या ऐतिहासिक क्षणाचे त्याला साक्षीदार व्हायचे आहे.
आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. लॉस एंजेलिसच्या डॉली थिएटरमध्ये 12 मार्च (भारतात 13 मार्च) रोजी होणाऱ्या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर हे सुपरस्टार या गाण्यावर ताल धरताना दिसतील. विशेष म्हणजे यावेळी लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये होणाऱ्या 95 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात नाटू नाटू या गाण्याचे लाईव्ह सादरीकरण होणार आहे. या गाण्याचे मूळ गायक राहुल सिपलीगुंज आणि काळ भैरव यावर्षी ऑस्करमध्ये परफॉर्मन्स करणार आहेत. यापूर्वी अकादमीने याबद्दलची माहिती सोशल मीडियावरुन दिली होती.
राण दग्गुबत्तीची वर्कफ्रंट - दरम्यान, राण दग्गुबत्ती सुरवीन चावलासह व्यंकटेश दग्गुबत्ती, सुशांत सिंग, अभिषेक बॅनर्जी, आशिष विद्यार्थी, गौरव चोप्रा आणि राजेश जैस यांच्यासह राणा नायडू मालिकेमध्ये दिसणार आहेत. करण अंशुमन आणि सुपर्ण एस वर्मा यांनी दिग्दर्शित केलेली ही मालिका 10 मार्चपासून ओटीटी जायंट नेटफ्लिक्सवर हिंदी, तेलगू, तमिळ आणि मल्याळममध्ये प्रवाहित होईल.
हेही वाचा - Addison's To Sushmita Sen : ह्रदयरोगाआधी सुष्मिता सेनला झाला होता एडिसन डिसीज, सांगितला थरारक अनुभव