मुंबई - सुपरस्टार शाहरुख खानने काल 'रमैय्या वस्तावैय्या' गाण्याची झलक शेअर केली होती. पूर्ण गाणे आज रलीज होणार, असे वचनही त्याने चाहत्यांना दिले होते. त्यानुसार हे धमाल गाणे आता प्रेक्षकांसाठी निर्मात्यांनी उपलब्ध करुन दिले आहे. गाणे हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज करण्यात आले आहे.
पार्टी सॉन्ग असलेल्या 'रमैय्या वस्तावैय्या' गाण्यावर शाहरुख काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये बिनधास्त थिरकला आहे. या सुंदर गाण्याची कोरिओग्राफी वैभवी मर्चंटने केली असून संगीतकार अनिरुद्ध रविंचदरने याला ताल धरायला लावणारी चाल संगीतबद्ध केली आहे. कुमार यांनी लिहिलेल्या या गीताला अनिरुद्ध रविचंदर, विशाल दादलानी आणि शिल्पा रावने आपला स्वरसाज चढवला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'रमैय्या वस्तावैय्या' हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर शाहरुखचे चाहते आता जवान चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा करत आहेत. यासाठी आता रक्षा बंधनाच्या सणाची वाट पाहावी लागणार आहे, कारण ३१ ऑगस्ट रोजी रक्षा बंधनाच्या निमित्ताने जवानचा खूप काळ प्रतीक्षा असलेला ट्रेलर रिलीज केला जाणार आहे. शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये जगभरात थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
'रमैय्या वस्तावैय्या' हे मूळ गाणे १९५५ मध्ये रिलीज झालेल्या 'श्री ४२०' या चित्रपटाती गाजले होते. मोहम्मद रफी आणि लंता मंगेशकर यांनी गायलेले मूळ गीत कवी शैलेंद्र यांनी लिहिले होते आणि शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केले होते. आजही या गाण्याची भुरळ भारतीय संगीत प्रेमींना आहे. 'जवान'मध्ये या गाण्याचे रिक्रिएशन करण्यात आले असून हे नवे गीत आपल्या तालावर ठेका धरायला लावणारे आहे.
'जवान' चित्रपटातील यापूर्वी रिलीज झालेल्या 'जिंदा बंदा' आणि 'चलेया' या गाण्यांना प्रेक्षकांना चांगला प्रतिसाद दिला आहे. चित्रपटाचे रिलजी जस जसे जवळ येत आहे तसे चित्रपटाचे प्रमोशन नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. ३१ ऑगस्टला ट्रेलर रिलीज होणार असल्यामुळे तिथून पुढे 'जवान' चित्रपटाची उत्कंठा शिगेला पोहोचेल असेच नियोजन निर्मात्यांनी केले आहे.
हेही वाचा -
२. Kajol Buys An Office Space : काजोलने मुंबईत खरेदी केले कोट्यावधीचे ऑफिस; जाणून घ्या किंमत...
३. Miss World In Kashmir : मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलावस्काने दिली नंदनवनाला भेट, पहा व्हिडिओ