ETV Bharat / entertainment

RGVs sensational tweet: एसएस राजामौलीवर हल्ला करणाऱ्या पथकात राम गोपाल वर्माचा समावेश, रामूचे ४ ड्रिंक डाऊन ट्विट - राम गोपाल वर्मा वादग्रस्त ट्विट

राम गोपाल वर्मा यांनी एसएस राजामौली यांना मारण्याची इच्छा असलेल्या चित्रपट निर्मात्यांच्या हत्येच्या पथकाचा एक भाग असल्याचे 'गुपीत' सोशल मीडियावर उघड केले. रात्री उशिरा रामूने केलेले खळबळजनक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

RGVs sensational tweet
RGVs sensational tweet
author img

By

Published : Jan 24, 2023, 3:31 PM IST

मुंबई - दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करत चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांचे कौतुक केले आहे. आणि मिश्कील विनोदासाठी ओळखल्या जाणाऱ्या रामूने ( राम गोपाल वर्माला रामू या नावानेच ओळखले जाते ) एक मस्करीत ट्विट केले आहे. एसएस राजामौली यांना मिळालेल्या यशामुळे इतरजण त्यांच्यावर जळत असून इर्षा करत आहेत. त्यामुळे निर्माता दिग्दर्शक राजामोली यांच्यावर इतर निर्माते हल्ला करण्याची तयारी करत आहेत. यासाठी त्यांनी एक पथक बनवले असून, या पथकात आपलेही नाव असल्याचे रामूने म्हटलंय. हे गुपित चार पेग डाऊन असल्यामुळे कबुल करत असल्याचेही त्याने लिहिलंय.

  • From Dada Sahab Phalke onwards till now , no one in the history of Indian cinema including @ssrajamouli could have imagined that an Indian director someday will go through this moment https://t.co/85gosw66qJ

    — Ram Gopal Varma (@RGVzoomin) January 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राम गोपाल वर्माने ट्विटरवर 28 व्या क्रिटिक्स चॉईस अवॉर्डमधील जेम्स कॅमेरॉन यांच्याशी झालेल्या संभाषणातील राजामौलीचा व्हिडिओ पुन्हा शेअर केला जिथे RRR ने सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट जिंकला होता. त्यांनी त्याला कॅप्शन दिले: दादा साहेब फाळके यांच्यापासून आजपर्यंत, इतिहासात कोणीही एसएस राजामौलीसारखा भारतीय दिग्दर्शक कधीतरी या क्षणातून जाईल याची कल्पनाही केली नसेल.

निर्माता राम गोपाल वर्माने राजामौली यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आणि लिहिलं, 'हाय राजामौली सर, तुम्ही मुघले आझम हा चित्रपट बनवणाऱ्या के असिफ ते शोले बनवणाऱ्या रमेश सिप्पी पर्यंत आणि आदित्या चोप्रा, करण जोहर, भन्साळी यांच्या सारख्या प्रत्येक चित्रपट निर्मात्याला मागे टाकले आहे. यासाठी मला तुमच्या पायाचे बोट चोखायचे आहे.'

'आणखी एक राजामौली सर, तुम्ही कृपया तुमची सुरक्षा वाढवा कारण भारतात असे अनेक चित्रपट निर्माते आहेत ज्यांनी शुद्ध ईर्षेपोटी तुम्हाला मारण्यासाठी एक घातपाती पथक तयार केले आहे, ज्याचा मी देखील एक भाग आहे...मी फक्त रहस्य उघड करत आहे कारण मी ४ ड्रिंक डाऊन आहे.' असे सनसनाटी स्वभावाच्या राम गोपाल वर्माने म्हटलंय. रामूचे हे ट्विट आता व्हायरल बनले आहे.

  • And sir @ssrajamouli , please increase ur security because there is a bunch of film makers in india who out of pure jealousy formed an assassination squad to kill you , of which I am also a part ..Am just spilling out the secret because I am 4 drinks down

राजामौलीच्या आरआरआर चित्रपटाने भारतातील सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पहिला गोल्डन ग्लोब पुरस्कार देखील जिंकला. या चित्रपटात राम चरण आणि जूनियर एनटीआर मुख्य भूमिकेत होते तर आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्याही विशेष भूमिका होत्या.

राम गोपाल वर्माच्या या ट्विटवर मिश्कील प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. चार पेग नंतरही तुमचे इंग्लिश बरंय, असे एकाने लिहिलंय. अजून चार मारा आणि झोपा असा सल्ला एका युजरने दिलाय. अजून चार पिला तर टीममधील इतरांचेही नावे सांगाल, असंही एका युजरने म्हटलंय. अजूनही तुमचा शिवा हा चित्रपट एसएस राजामौलीचा आदर्श चित्रपट असल्याचेही एकाने म्हटलंय.

हेही वाचा - Shriya Pilgaonkar Tweet : श्रीया पिळगावकर ट्विट करत म्हणाली 'कलाकारांना असे वाटू नये की, काम मिळवण्यासाठी...'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.