ETV Bharat / entertainment

Ram Charan : राम चरणनं चित्रपटसृष्टीत 16 वर्ष केली पूर्ण ; पत्नी उपासना कामिनेनीनं शेअर केली पोस्ट.... - चित्रपटसृष्टीत 16 वर्षे पूर्ण

Ram Charan : साऊथ अभिनेता राम चरण यानं चित्रपटसृष्टीत 16 वर्षे पूर्ण केली आहेत. हा प्रसंग साजरा करण्यासाठी त्याची पत्नी उपासना कामिनेनीनं इंस्टाग्रामवर एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे.

Ram Charan
राम चरण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 5:15 PM IST

मुंबई - Ram charan : राम चरणनं आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेकजणांची मने जिंकली आहेत. त्याचे अनेक चाहते आहेत. दरम्यान आता या खास प्रसंगी राम चरणची पत्नी उपासना कामिनेनीनं तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक कोलाज शेअर केले आहे. या कोलाजमध्ये तिनं त्याच्या 'आरआरआर' चित्रपटामधील दोन पोस्टर एकत्र करून यावर 'स्वीट सिक्सटीन' असं लिहलं आहे. रामनं अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांचा सामंथा रुथ प्रभूसोबतचा 'रंगस्थलम' हा चित्रपट जबरदस्त हिट होता. चित्रपटसृष्टीत 16 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्याचा 'रंगस्थलम' हा चित्रपट रूपेरी पडद्यावर पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात आला आहे.

चित्रपटसृष्टीत 16 वर्षे पूर्ण : हा चित्रपट श्रीकाकुलम, विजयनगरम, विशाखापट्टणम, राजमुंद्री, नेल्लोर, अनंतपूर आणि हैदराबादमध्ये दाखविला जात आहे. 'रंगस्थलम'च्या पुन्हा एकदा रिलीज झाल्यानंतर राम हा खूप खुश झाला आहे. 'रंगस्थलम' चित्रपटाच्या रिलीजची घोषणेवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्यानं लिहलं कि, 'रामनं अप्रतिम 16 वर्ष पूर्ण केल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. द सेलिब्रेशन्स गेटिंग बिग अँड बिगर.' दुसर्‍या चाहत्यानं कमेंट करत म्हटलं , 'राम चरणचा हा चित्रपट थिएटरमध्ये आणखी धमाल करणार आहे'. आणखी एका चाहत्यानं या पोस्टवर कमेंट करत म्हटलं, 'राम चरण हा खूप चांगला अभिनय करतो, त्याचे चित्रपट हिट होतात' अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत. काहीजण त्याला या खास प्रसंगी शुभेच्छा देत आहेत.

रंगस्थलम चित्रपट पुन्हा एकदा झाला प्रदर्शित : सुकुमार दिग्दर्शित अ‍ॅक्शन ड्रामा 'रंगस्थलम', 2018 मध्ये थिएटरमध्ये दाखल झाला होता. हा चित्रपट तेलुगूमधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे, या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सुमारे 216 कोटी रुपयांची कमाई केली. 'रंगस्थलम' चित्रपट 60 कोटींहून अधिक बजेटमध्ये बनवण्यात आला होता. या अ‍ॅक्शन चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफीसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता. 'रंगस्थलम' टॉप 25 तेलुगू चित्रपटमध्ये येतो. राम चरण आणि सामंथा यांच्याशिवाय या चित्रपटात पिनिसेट्टी, प्रकाश राज, अनसूया भारद्वाज आणि जगपती बाबू यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच त्याचा 'आरआरआर' 2022चा हिट चित्रपट आहे. 'आरआरआर' चित्रपटामधील 'नाटू नाटू' हे गाणं खूप प्रसिद्ध झालं होतं. या गाण्याला ऑस्कर मिळाला आहे. या गाण्याची लोकप्रियता जगभरात पसरली आहे.

हेही वाचा :

  1. Birthday celebration : नयनताराचा पती विघ्नेश शिवननं जुळ्या मुलांच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो केली शेअर
  2. Lata Mangeshkar birth anniversary : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता दीदींचे जयंतीनिमित्त केले स्मरण
  3. Fukrey 3 BO collection day 1: 'द व्हॅक्सिन वॉर'शी संघर्ष असूनही चांगल्या रितीने सुरू झाला 'फुक्रे 3' चा पहिला दिवस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.