ETV Bharat / entertainment

Ram Charan birthday: सुपरस्टार चिरंजीवला मुलगा राम चरणचा अभिमान, समंथानेही दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - राम चरणचा आगामी चित्रपट गेम चेंजर

उदयोन्मुख जागतिक स्टार राम चरण सोमवारी आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याला अनेक सेलिब्रिटींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात त्याचे वडील चिरंजीवीपासून ते समंथा रुथ प्रभू आणि रकुल प्रीत सिंगपर्यंत, सेलेब्रिटींनी राम चरण याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मेगास्टार चिरंजीवाला राम चरणचा अभिमान, समंथानेही दिल्या शुभेच्छा

author img

By

Published : Mar 27, 2023, 1:27 PM IST

मुंबई - आरआरआर स्टार राम चरण आज त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेता आणि निर्माता असलेल्या राम चरणला सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राम चरण याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्यामध्ये त्याचे मेगास्टार वडील चिरंजीवी आणि रंगस्थलम या त्याच्या गाजलेल्या चित्रपटाची सहकलाकार समंथा रुथ प्रभू देखील आहेत.

मेगास्टार चिंरजीवीच्या राम चरणला शुभेच्छा - ट्विटरवर चिरंजीवीने एक प्रेमळ फोटो शेअर केला ज्यामध्ये तो राम चरणवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. मेगास्टारने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो राम चरणच्या गालावर किस करताना दिसत आहे. चरणला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना चिरंजीवीने लिहिले, 'नन्ना तुझा अभिमान आहे. राम चरण तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!'.

रंगस्थलमची सहकलाकार समंथा रुथ प्रभू - सोशल मीडियावर राम चरणाला शुभेच्छा देणाऱ्या पहिल्या सेलिब्रिटींमध्ये अभिनेत्री समंथा देखील आहे. समंथाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर राम चरणसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लिहिल्या आणि लिहिले, 'एका विलक्षण प्रवासाची तू नव्यानेच सुुवात केली आहेस. अतिशय दयाळू आणि आदरणीय असलेल्या तुझा एक स्वतःचा चाहता वर्ग आहे. राम चरणला वाढदिवसाच्या शुभेच्छा.'

ध्रुव आणि ब्रूस ली: द फायटरमध्ये राम चरणसोबत काम केलेल्या रकुल प्रीत सिंहने देखील राम चरणसाठी इन्स्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट लिहिली आहे. ध्रुव शूट डायरीमधून राम चरणसोबतचा एक फोटो शेअर करत रकुलने लिहिले: ग्लोबल स्टार चरण तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हाला सर्व यश, आरोग्य, वाढ आणि खूप आनंददायी काळासाठी शुभेच्छा. राम चरणच्या आगामी चित्रपट RC15 च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या मोशन टायटल रिलीज केल्याने चाहत्यांचा उत्साह दुप्पट झाला आहे.

चित्रपटाचे शीर्षक गेम चेंजर शंकर दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव गेम चेंजर आहे. राम चरण शिवाय या राजकीय अॅक्शन ड्रामा चित्रपटामध्ये कियारा अडवाणी देखील मुख्य भूमिकेत आहे. सुरुवातील या चित्रपटाचे शीर्षक ठरले नव्हते. परंतु शुटिंगला सुरुवात करण्यात आली होती. वर्किंग टायटल RC15 म्हणून या चित्रपटाचे तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यातील विविध लोकेशन्सवर याचे शुटिग पार पडले आहे. राम चरणच्या वाढदिवसाचा दिवस लक्षात घेऊन या चित्रपटाचे शीर्षक गेम चेंजर असे घोषित करण्यात आले.

हेही वाचा - Ram Charan birthday : राम चरणच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम तीन सर्वोत्तम भूमिका कोणत्या? टाका एक नजर!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.