हैदराबाद : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार आणि मेगा ब्लॉकबस्टर फिल्म 'RRR' फेम राम चरण तेजा याने त्याच्या चाहत्यांना मोठी खुशखबर दिली आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर जाहीर केले आहे की तो बाप होणार आहे. लग्नाच्या 10 वर्षांनंतर राम चरण वडील होणार आहे.
राम चरणने २०१२ मध्ये उपासनासोबत लग्न केले होते. आता लग्नाच्या 10 वर्षानंतर राम चरण आणि उपासना यांच्या घरात पहिल्यांदाच पाळणा हलणार आहे. त्याचबरोबर साऊथ सिनेसृष्टीतील मेगास्टार चिरंजीवी पहिल्यांदाच आजोबा बनणार आहेत. चिरंजवी आणि राम चरण या दोघांनी सोशल मीडियावर चाहत्यांना ही खुशखबर सांगितली आहे.
![राम चरण तेजा आणि उपासना यांनी चाहत्यांना दिली 'गुड न्यूज'!!](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/unknown_319727961_572634374872016_3412428349967517181_n_1212newsroom_1670838288_470.jpg)
पिता-पुत्राने मिळून दिली आनंदाची बातमी - चिरंजीवी आणि राम चरणने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर बाल हनुमान लिहिलेले आहे, ''हनुमान जीच्या आशीर्वादाने... आम्हाला कळवायला अतिशय आनंद होत आहे की उपासना आणि राम चरण यांना पहिले अपत्य होणार आहे.''
वयाच्या 27 व्या वर्षी राम चरणने 2012 मध्ये उपासना कामिनेनीसोबत लग्न केले होते. लग्नाच्या 10 वर्षानंतर दोघेही आई वडील होत आहेत. ही आनंदाची बातमी ऐकल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राम चरणचा वर्कफ्रंट - राम चरणच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, अभिनेता शेवटचा दक्षिणेकडील दिग्गज दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने जगभरात 1100 कोटींहून अधिक कमाई केली होती. आता राम चरण तमिळ चित्रपटांचे सर्वोत्कृष्ट आणि दिग्गज दिग्दर्शक एस. शंकर यांच्या R15 या प्रोजेक्टवर काम करत आहे.
हेही वाचा - पठाणमधील बेशरम रंग गाणे ट्रोलर्सच्या निशाण्यावर, ट्यून कॉपी केल्याचा आरोप