ETV Bharat / entertainment

राखी सावंतनं अब्रुनुकसानीचा गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात घेतली धाव - राखी सावंतनं उच्च न्यायालयामध्ये घेतली धाव

Rakhi sawant : राखी सावंतवर एका मॉडेलनं अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केल्यानंतर तिने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. राखीवर हा गुन्हा 31 ऑक्टोबर 2022 रोजी दाखल झाला होता.

Rakhi sawant
राखी सावंत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 12:05 PM IST

Updated : Dec 5, 2023, 12:24 PM IST

मुंबई - Rakhi sawant : अभिनेत्री राखी सावंत आता ही तिच्या वादग्रस्त विधानामुळं नेहमीच चर्चेत असते. दरम्यान पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. राखी सावंतवर एका मॉडेलनं अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करावा अशी मागणी राखी सावंतनं सध्या केली आहे. यासाठी तिनं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राखीनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. पुढील काही दिवसांत उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी होईल. राखीवर हा गुन्हा 31 ऑक्टोबर 2022 रोजी दाखल करण्यात आला होता.

राखी सावंतवर केला गुन्हा दाखल : हा गुन्हा रद्द करण्यासाठी राखी सावंतचे वकील अली काशीद खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राखी सावंत यांनी कोणतीही बदनामी केलेली नाही, असं याचिकेत नमूद केलंय. याशिवाय या महिलेनं राखी सावंतसोबत सूड घेण्यासाठी गुन्हा दाखल केला आहे असं या याचिकेत आहे. राखी सावंतनं तक्रारदार महिलेचे काही व्हिडिओ सार्वजनिक केले होते, त्यामुळं या महिलेनं तिला बदनाम करत असल्याचं म्हटलं होतं.

राखी सावंतच्या नावावर हे गुन्हे दाखल झाले : राखी सावंतवर आयपीसी कलम 354 कोणत्याही व्यक्तीचा अपमान करणे त्यानंतर आयपीसी कलम 500 म्हणजे बदनामी करणे. कलम 504 म्हणजे धमकी देणे आणि कलम 509 म्हणजे महिलेच्या गोपनीयतेचा भंग करणे तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत कलम 67 या आधारे देखील गुन्हा नोंदवला गेला आहे. असं या याचिकेत आहे.

राखी सावंतच्या वकिलानं काय सांगितलं?: राखी सावंतचा वकील अली काशिफा खान यांनी म्हटलं की ," राखी सावंत ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिच्या सहकारी महिलेने तिच्यावर 354 अ अंतर्गत छळ केला, असा हा आरोप केलेला आहे. परंतु हा आरोप केवळ जेव्हा पुरुष एखादी महिलेला त्रास देतो, तेव्हाच लावल्या जातो. महिलेबाबत असा गुन्हा नोंदवू शकत नाही. यापूर्वी देखील राखीवर अनेक आरोप करण्यात आले आहेत.

हेही वाचा :

  1. सीआयडीचा फ्रेडरिक गेला, अभिनेता दिनेश फडणीसचं निधन
  2. अजय देवगण 'सिंघम अगेन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी
  3. 'अ‍ॅनिमल' आणि 'सॅम बहादूर' चित्रपट करणार रिलीजच्या चौथ्या दिवशी 'इतकी' कमाई

Last Updated : Dec 5, 2023, 12:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.