ETV Bharat / entertainment

Rakhi Sawant on love jihad : लव्ह जिहादचा शब्द उच्चरताच भडकली राखी सावंत, म्हणाली - 'मी इस्लाम कबुल केलाय' - पती आदिल मारत होता राखीचा खुलासा

पती आदिल विरुध्द एफआयआर दाखल केल्यानंतर राखी सावंत सध्या चर्चेत आली आहे. पापाराझी तिच्या सतत मागावर असतात. राखीही सनसनाटी विधाने करुन पापाराझींना नाराज करत नाही. एकाने राखीला लव्ह जिहादचा प्रकार घडलाय का, असे विचारताच ती भडकली. 'मी स्वतः मुस्लिम आहे, हेमी इस्लाम कबुल केला आहे. हिंदू-मुस्लिम बद्दल काही बोलायचे नाही.', असे म्हणत राखी फणकाऱ्याने निघून गेली.

Rakhi Sawant on love jihad
Rakhi Sawant on love jihad
author img

By

Published : Feb 8, 2023, 2:16 PM IST

मुंबई - बॉलिवूडची वादग्रस्त ड्रामा क्विन राखी सावंत सध्या चर्चेत आहे. गेल्या महिनाभरापासून तिच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडल्या. पहिली गोष्ट म्हणजे तिने आपले लग्न आदिल दुर्रानीशी केल्याचे फोटोसह जाहीर केले. त्यानंतर तिने मुस्लीम धर्माचाही स्वीकारल्याचे सांगितले. काही दिवसातच आदिलने आपल्याला धोका दिल्याचेही ती बोलत राहिली. आईच्या ऑपरेशनसाठी आदिलला दिलेले पैसेही त्याने हडप केल्याचा आरोप तिने केला. आता तर तिने पती आदिल विरुध्द एफआयआरही दाखल करुन न्यायाची भाषा करायला सुरुवात केली आहे. हे सगळे सुरू असताना पापाराझी तिच्या सतत मागावर असतात. तिला प्रश्न विचारुन बातमी मिळवण्याचा प्रयत्न करतात. राखीही सनसनाटी विधाने करुन पापाराझींना नाराज करत नाही. एकाने राखीला लव्ह जिहादचा प्रकार तिच्या बाबतीत घडलाय का, असे विचारताच राखी त्याच्यावर भडकली.

संतापलेली राखी म्हणाली, 'मी स्वतः मुस्लिम आहे, मी इस्लाम कबुल केला आहे. हिंदू-मुस्लिम बद्दल काही बोलायचे नाही. असे म्हणत राखी फणकाऱ्याने निघून गेली. आजच्या परिस्थितीत राखी सावंतचे लग्न सध्या तुटण्याच्या मार्गावर आहे. 7 फेब्रुवारी रोजी राखीने आदिलवर अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप करत तक्रार दाखल केली, त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या काळात राखी मीडियाशी बोलत राहिली. दरम्यान, तिच्यासमोर कोणीतरी पापाराझीने लव्ह जिहाद असा शब्द वापरला, त्यानंतर मात्र राखीने आपला संताप व्यक्त केला.

पती आदिल मारत होता, राखीचा खुलासा - आदिल्यच्या घरच्या लोकांनी राखीला संपर्क केला का असे विचारले असता, राखीने सासूने संपर्क केल्याचे सांगितले. गेल्या सहा महिन्यापासून आदिल छळ करत असल्याचे तिने सासूला सांगितले. तूझ्या जागी जर मी असते तर त्याला कधीच सोडून दिले असते, तू त्याला सोडून दे असा सल्लाही सासूने दिल्याचे राखीने सांगितले. त्याचे खूप क्रिमिनल रोकॉर्ड आहे, लग्नाच्या आधी हे जर मला माहिती असते तर आजचा हा दिवस आला नसता, असेही राखी म्हणाली.

राखी बेशुद्ध होऊन पडली - गेल्या अनेक दिवसांपासून राखी खूप अस्वस्थ आहे, मंगळवार ७ फेब्रुवारीचा दिवसही तिच्यासाठी खूप खडतर होता. तिने पती विरोधात तक्रार केल्यानंतर मीडियाला समोर जात असतानाच तिला चक्कर आली. तिच्या सहकाऱ्यांनी राखीच्या चेहऱ्यावर पाणी मारुन तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला आपल्या कारमध्ये बसवण्यात आले.

हेही वाचा - Sid Kiara Wedding Look : सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणीचा स्वप्नवत लग्नाचा लुक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.