नवी दिल्ली - कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना बुधवारी जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून, चाहते राजू श्रीवास्तव लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत आणि त्यांच्या प्रकृतीबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान, राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आल्याचे वृत्त येत आहे.
राजू श्रीवास्तव 10 ऑगस्ट रोजी दिल्लीतील जिममध्ये वर्कआउट करत होते. तो ट्रेडमिलवर धावत असताना अचानक त्याच्या छातीत तीव्र वेदना होऊन तो खाली पडला. राजू श्रीवास्तव यांना तातडीने एम्समध्ये दाखल करण्यात आले. काही नेत्यांना भेटण्यासाठी राजू श्रीवास्तव दिल्लीत मुक्कामी असल्याची माहिती राजू श्रीवास्तव यांच्या पीआरओने दिली होती. बुधवारी सकाळी तो जिममध्ये गेला असताना तेथे त्याची प्रकृती खालावली.
राजू श्रीवास्तव यांना एम्सच्या कार्डियाक केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले असून डॉक्टरांची टीम त्याची तपासणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. राजू श्रीवास्तव यांची अँजिओग्राफीही करण्यात आली, ज्यामध्ये त्यांच्या हृदयाच्या मोठ्या भागात 100% ब्लॉकेज आढळून आले. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती सध्या अत्यंत नाजूक असून त्यामुळेच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
राजू श्रीवास्तव केवळ विनोदी कलाकारच नाही तर अभिनेता आणि राजकारणी देखील आहेत. 1988 मध्ये छोट्या-छोट्या भूमिकांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा राजू श्रीवास्तव सलमान खानच्या मैने प्यार किया या चित्रपटात दिसला होता. नंतर त्याने आणखी काही चित्रपट केले आणि नंतर कॉमेडीमध्ये प्रवेश केला.
राजू श्रीवास्तवच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्याने 1993 मध्ये लखनऊमध्ये राहणाऱ्या शिखासोबत लग्न केले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
हेही वाचा - मराठमोळी 'बोल्ड अँड ब्यूटी' तेजस्वी प्रकाश आहे उत्तम गायिका पाहा व्हिडिओ