ETV Bharat / entertainment

Rajkummar Rao Birthday : प्रतिभेच्या जोरावर राजकुमार रावनं चित्रपटसृष्टीत कमावलं नाव.... - Rajkummar Rao celebrate birthday

Rajkummar Rao Birthday : राजकुमार राव आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. राजकुमारने आपल्या मेहनीतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. आज त्याची गणना यशस्वी स्टार्समध्ये केली जाते.

Rajkummar Rao
राजकुमार राव
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2023, 10:49 AM IST

Updated : Aug 31, 2023, 12:02 PM IST

मुंबई : Rajkummar Rao Birthday : राजकुमार राव 31 ऑगस्ट रोजी 39वा वाढदिवस साजरा करत आहे. राजकुमार रावने गेल्या काही वर्षांत काही चांगल्या व्यक्तिरेखा साकारत स्वतःबद्दल अपेक्षा निर्माण केल्या. अल्पावधीत त्यानं हे यश मिळवलं. आपल्या प्रतिभेच्या जोरावर इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली. राजकुमारने जवळपास 13 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक जबरदस्त चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. आज इंडस्ट्रीत त्याची गणना यशस्वी स्टार्समध्ये केली जाते. तो आज त्याच्या युवा चाहत्यांसाठी प्रेरणास्थान बनला आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊ या...

राजकुमारचा पहिला ब्रेक : राजकुमारला 2010 मध्ये रिलीज झालेल्या 'रण' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला. या चित्रपटात त्याने न्यूज अँकरची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याला दिबाकर बॅनर्जीच्या 'लव सेक्स और धोखा' या चित्रपटात काम मिळालं. याशिवाय त्याने 'रागिनी एमएमएस' या हॉरर चित्रपटात मुख्य भूमिका साकारून आपली ओळख चित्रपटसृष्टीत निर्माण केली. बॉलिवूडमध्ये त्याला आपले स्थान निर्माण करणं सोपं नव्हतं. मात्र त्याने हार मानली नाही. राजकुमार रावसाठी 'शाहीद' हा चित्रपट खूप महत्त्वाचा ठरला. या चित्रपटात त्याने वकील शाहिद आझमीची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

'न्यूटन'ने दिली नवी ओळख : राजकुमार राव संघर्षाच्या दिवसांत मुंबईसारख्या मायानगरीत टिकून राहण्यासाठी जाहिरातींमध्ये काम करत होता. राजकुमारने 'न्यूटन' चित्रपटात एका प्रामाणिक कारकुनाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर वेगळी छाप सोडली. चित्रपटातील त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे, 'न्यूटन'ला त्या वर्षी ऑस्करसाठी प्रवेश मिळाला. या चित्रपटासाठी त्याचं खूप कौतुक झालं. राजकुमार रावने बॉलीवूडमधील एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये आपले उत्कृष्ट अभिनय कौशल्य दाखवून प्रेक्षकांना वेड लावले. राजकुमार रावने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक पुरस्कार जिंकले आहेत. 2023 मध्ये 'बधाई दो' या चित्रपटासाठी त्याला 'फिल्मफेअर' सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. 2018 मध्ये, त्याला 'बरेली की बर्फी' या चित्रपटासाठी सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. राजकुमार रावच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, त्याने दीर्घकाळ डेटिंग केल्यानंतर 14 नोव्हेंबर 2021 रोजी अभिनेत्री पत्रलेखाशी लग्न केलं आणि त्यांचा सुखाचा संसार सुरु आहे.

हेही वाचा :

SRK is icon of love for India : 'शाहरुख हा भारतावरील प्रेमाचा प्रतिक', म्हणत कमल हासनने केले कौतुक

Dream Girl 2 box office collection: आयुष्मान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल 2' रिलीजच्या सहाव्या दिवशी गाठेल 60 कोटी टप्पा...

Gadar 2 vs OMG 2 box office day 20: 'गदर 2'चे कलेक्शन 500 कोटींच्या जवळ, 'ओएमजी 2'ने पार केला 130 कोटींचा आकडा

Last Updated : Aug 31, 2023, 12:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.