मुंबई - Rajinikanth : साऊथ सुपरस्टार रजनीकांत आज 12 डिसेंबर रोजी 73 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्तानं धनुषसह अनेक सेलिब्रिटी, प्रॉडक्शन हाऊस आणि चाहते रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. सोशल मीडिया पेजवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून अनेकजण थलाइवावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. दरवर्षी रजनीकांत यांच्या वाढदिवसाला त्यांचे हिट चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होतात. दरम्यान, यावर्षी त्यांचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'मुथू' नुकताच पुन्हा एकदा प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट रजनीकांतच्या चाहत्यांना खूप पसंत पडला होता. आता संपूर्ण तामिळनाडूमध्ये प्रेक्षकांची खचाखच गर्दी चित्रपटगृहांच्या बाहेर पाहायला मिळत आहे.
-
Happy birthday Thalaiva @rajinikanth 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️
— Dhanush (@dhanushkraja) December 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Happy birthday Thalaiva @rajinikanth 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️
— Dhanush (@dhanushkraja) December 12, 2023Happy birthday Thalaiva @rajinikanth 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️
— Dhanush (@dhanushkraja) December 12, 2023
रजनीकांत यांचा वाढदिवस : सुपरस्टार रजनीकांतच्या 73व्या वाढदिवसाच्या निमित्तानं चाहते आणि सेलेब्रिटी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सज्ज आहेत. रजनीकांतचा पूर्वाश्रमीचा जावई अभिनेता धनुष हा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या पहिल्या काही सेलिब्रिटींपैकी आहे. त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर त्यानं हात जोडून लिहिलं, 'हॅपी बर्थडे थलाइवा' याशिवाय त्यानं ही पोस्ट रजनीकांत यांना टॅग केली आहे. दरम्यानं रजनीकांत यांनी 2023 मध्ये नेल्सन दिलीप कुमारच्या 'जेलर'मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 650 कोटींहून अधिक कमाई केली. रजनीकांतचा आगामी 'लाल सलाम' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, ज्यामध्ये त्यांचा कॅमिओ असेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत यांनी केलं आहे.
-
My joy, My love , My inspiration, My Thalaivar @rajinikanth sir.#HBDSuperstarRajinikanth #ThalaivarNirandharam pic.twitter.com/FsHdnwcUb1
— Venkatesh MK (@venkateshmk_12) December 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">My joy, My love , My inspiration, My Thalaivar @rajinikanth sir.#HBDSuperstarRajinikanth #ThalaivarNirandharam pic.twitter.com/FsHdnwcUb1
— Venkatesh MK (@venkateshmk_12) December 12, 2023My joy, My love , My inspiration, My Thalaivar @rajinikanth sir.#HBDSuperstarRajinikanth #ThalaivarNirandharam pic.twitter.com/FsHdnwcUb1
— Venkatesh MK (@venkateshmk_12) December 12, 2023
रजनीकांत यांचं चित्रपटसृष्टीत पदार्पण : रजनीकांत यांनी 1975 मध्ये रिलीज झालेल्या 'अपूर्व रागांगल' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर त्यांनी एकामागून एक हिट चित्रपट दिले. या चित्रपटात रजनीकांत यांनी सहायक भूमिका साकारली होती. 'अपूर्व रागांगल' चित्रपटात कमल हसन, सुंदरराजन, श्रीविद्या आणि जयसुधा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक के. बालचंदर यांनी दिग्दर्शित केला होता. यानंतर रजनीकांत यांनी दक्षिण भारतातील सर्व भाषांमध्ये उल्लेखनीय कामं केली. हिंदी चित्रपटसृष्टीत रजनीकांतची इनिंग 1983 मध्ये टी. रामाराव दिग्दर्शित 'अंधा कानून' या चित्रपटाद्वारे झाली. हा चित्रपट देखील चाहत्यांना खूप पसंत पडला होता.
हेही वाचा :